Search
|
Government of India
  • दिशादर्शकाकडे जा
  • मुख्य विषयाकडे जा
  • अ-
  • अ
  • अ +
  • अ
  • अ
  • English
  • लॉगिन करा
Labour Department
कामगार आयुक्त महाराष्ट्र शासन
  • Shri. Devendra Fadnavis

    श्री. देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

  •  Shri. Eknath Shinde

    श्री. एकनाथ शिंदे माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

  • Shri. Ajit Pawar

    श्री. अजित पवार माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

  • Shri. Akash Fundkar

    श्री. आकाश फुंडकर मंत्री (कामगार)

  • Shri. Ashish Jaiswal

    श्री. आशिष जयस्वाल राज्यमंत्री (कामगार)

  • Smt. I. A. Kundan (IAS)

    श्रीमती. आय.ए. कुंदन (भाप्रसे ) प्रधान सचिव कामगार विभाग

  • Dr. H. P. Tummod (IAS)

    डॉ. एच. पी. तुम्मोड (भाप्रसे) कामगार आयुक्त

  • मुख्यपृष्ठ
  • संचालनालय
    • कामगार विभाग
      • आमच्याबद्दल
      • उद्दिष्टे
      • मिशन
      • संकल्प
      • विभागवार संघटन
      • विभागाचे कार्य
    • कामगार आयुक्त
      • आमच्याबद्दल
      • उद्दिष्टे
      • मिशन
      • दृष्टीकोन
      • कार्य
      • अंदाजपत्रक
      • विभागवार संघटन
      • प्रादेशिक कार्यालये
      • माथाडी मंडळ
      • सुरक्षा रक्षक मंडळ
      • संपर्क
    • विकास आयुक्त (असंघटीत कामगार)
      • असंघटित कामगार
    • औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय
    • बाष्पके संचालनालय
    • कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था
    • महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ
    • BOCW
  • सेवा
    • कामगार आयुक्त सेवा
    • बाष्पके संचालनालय सेवा
      • संस्थेबद्दल
      • सेवा
      • त्वरित लिंक्स
    • औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय सेवा
    • कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था सेवा
  • नवीन काय आहे
  • मीडिया गॅलरी
    • छायाचित्र दालन
    • व्हिडिओ गॅलरी
  • निरीक्षण
  • निविदा
    • महा निविदा
    • विभागाच्या निविदा
    • GEM पोर्टल
  • परिपत्रके / अधिसूचना
  • लोकसेवा हक्क अधिनियम
  • माहिती अधिकार अधिनियम
  • 100 दिवस कार्यक्रम अहवाल
  • संपर्क
Labour Banner

बांधकाम कामगार

इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्थी) अधिनियम,१९९६

ठळक वैशिष्टे

पार्श्वभूमी

भारतामध्ये इमारत आणि इतर बांधकाम करणारे कामगार आहेत.हे असुरक्षित आणि असंघटीत आहे.त्यांचे काम हे तात्पुरते तसेच अल्पकालीन असते.तसेच कामगार आणि मालक यांचे संबंध सुद्दा तात्पुरते असतात.त्यांचे कामाचे तास अनिश्चित आहेत. त्यांच्याकडून जास्त वेळेपर्यंत काम करून घेतले जाते. ते जेथे काम करतात तेथे त्यांना सुविधा नाहीत. तसेच कल्याणकारी सुविधा पण नाहीत. त्यामुळे कामगारच्या सुरक्षा, स्वास्थ्य आणि कल्याणासाठी भारत सरकाने विचार केला कि, एक व्यापक केंद्र विधी विधान करण्याची गरज आहे. त्यामुळे कामगारच्या सुरक्षा, स्वास्थ्य आणि कल्याणासाठी भारत सरकाने विचार केला कि, एक व्यापक केंद्र विधी विधान करण्याची गरज आहे आणि तो कायदा ०१/०३/१९९६ पासून लागू करण्यात आला.

हा कायदा सर्व आस्थापनासाठी लागू आहे, जे कि, ते आस्थापन कमीतकमी १२ महिन्यांपर्यंत चालू असावे.आणि त्या आस्थापनमध्ये कमीतकमी १० व त्यापेक्षा जास्त कामगार असणे गरजेचे आहे.

काही महत्वाच्या व्याख्या

इमारत कामगार

म्हणजे जे कामगार कोणतेही काम हे कुशल, अर्ध-कुशल, शाररिक श्रमाने, पर्यवेकक्षक, टेक्नीकल, व कारकुनाचे काम तसेच दुसरीकडे भाड्याने काम करणे व त्याबदल्यात मोबदला मिळवणे असे असा होय.

व्यवस्थापकीय किंवा प्रशासकीय अधिकारी

लाभार्थी

भाग १२ मध्ये नोंदणीकृत इमारत कामगार

इमारत व इतर बांधकाम कामगार

ची व्याख्या (कलम २(d)) मध्ये दिलेली आहे. बांधकाम, फेरफार, दुरुस्ती, देखभाल, किंवा पाडून टाकणे इत्यादी इमारत, रस्ते, मार्ग, रेल्वे, ट्रामवेज, एअर फिल्ड्स, पाठबंधारे, जलनिस्सारण, बंधारा व नेव्हिगेशन काम, पूर नियत्रणाचे काम (वादळामुळे जलनिस्सारणाच्या कामासहित) तेल व वायूची जोडणी टाकणे, विद्यूत लाईन्स, वायरलेस, रेडिओ, टेलीव्हिजन, टेलीफोन, टेलिग्राफ, आणि समुद्रपार दळणवळण, धरणे, कालवे, जलाशये, जलप्रवाह, बोगदे, पूल, सेतू, सेतूप्रणाल, पाईपलाईन, टॉवर्स, कुलीग टॉवरर्स पारेषण टॉवर्स आणि या प्रकारचे इतर कामे समुचित शासन अधिसूचनेद्वारे लागू करू शकते परंतु कारखाने अधिनियम, १९४८ किंवा खाण अधिनियम, १९५२ च्या तरतुदी ज्या आस्थापनेस लागू होतात त्यांना इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियमाच्या तरतुदी लागू नाहीत

ठेकेदार

जो हे नियम लागू असलेली कोणतीही कामे किंवा बांधकामे हाती घेतो असा ठेकेदार.सेवा कराराखाली कोणतेही काम किंवा सेवा पार पाडण्यासाठी कोणत्याही कारागीरास, व्यापा-यास किंवा इतर व्यक्तीवर परिणाम करतील असा या नियमाच्या आवश्यक बाबींचे अनुपालन करणे हे त्या ठेकेदाराचे कर्तव्य असेल आणि प्रयोजनार्थ, या नियमातील कामगारांच्या संबंधातील कोणत्याही निर्देशात अशा कामगाराच्या, व्यापाराच्या किंवा इतर व्यक्तीच्या निर्देशाचा समावेश होईल आणि तो ठेकदार त्याचा नियोक्ता असल्याचे समजण्यात येईल.

मालक

ची व्याख्या कलम २(ई) मध्ये इस्टाब्लीशमेंट संबंधात नमूद केलेली आहे.त्यात खालीलप्रमाणे अंतर्भाव होतो.

  • इमारत व इतर बांधकाम काम स्थानिक संस्थातर्फे किंवा इतर आस्थापनेमार्फत करण्यात येत असल्यास व त्यात अधिकारी नेमून दिलेला नसल्यास अशा बाबतीत विभागाचा प्रमुख.
  • जेथे इमारत व इतर बांधकामाचे काम स्थानिक प्राधिकरणामार्फत किंवा इतर आस्थापनामार्फत, थेट कंत्राटदारा शिवाय करण्यात येत अशा बाबतीत त्या प्राधिकरणाचा किंवा आस्थापनेचा मुख्य कार्यकारी अधिकारी
  • इमारत व इतर बांधकाम कामगार कंत्राटदारामार्फत करण्यात येत अशा बाबतीत कंत्राटदार.

आस्थापना

म्हणजे कलम २(जे ) कोणतेही आस्थापना जी शासनाच्या नियंत्रणात आहे. कोणत्याही निगमच्या नियंत्रणाखाली आहे किंवा व्यवसाय सस्थेच्या नियंत्रनाखाली आहे. आणि वैयक्तिक किंवा असोशिएशन किंवा वैयक्तिक संस्थांच्या अंतर्गत जे बांधकाम कामगार नियुक्त करतात आणि ज्यात कंत्राटदारांचा समावेश होतो परंतु व्येक्तीगतरित्या जे असे कामगार त्यांचे स्वताचे घर बांधण्याकरिता रुपये १० लाख पर्यत पेक्षा जास्त नसेल ते त्यांना आस्थापनेची व्याख्या लागू होणार नाही.

दंड

ज्याने कोणी पण कलम ४० नुसार या अधिनियमातील तरतुदीचा भंग केल्यास तीन महिन्यापर्यंत कैद किंवा रु २०००/- पर्यंत दंड किवा दोन्हीहि, तसेच तरतुदीचे पालन करेपर्यंत प्रत्येक दिवसाला रु १००/- इतका दंड.

जो व्येक्ती कलम ४७ चे उपकलम (१) च्या नुसार दोषी असेल.आणि नियमाचे पुन्हा अनुपालन करत नसेल त्यास सहा महिन्यापर्यत कैद किंवा रु ५००/- पेक्षा जास्त पण रु २००० पेक्षा कमी दंड.किंवा दोन्हीही.

सुरक्षा समिती आणि सुरक्षा अधिकारी यांची नेमणूक

प्रत्येक आस्थापना ज्या ठिकाणी पाचशे किंवा त्यापेक्षा अधिक बांधकाम कामगार सर्वसाधारण नियुक्त केलेले आहेत,तेथे नियोक्त्याकडून एक सुरक्षा समिती स्थापन केली जाईल,ज्यामध्ये नियोक्त्याचे व अशा आस्थापनामध्ये नियुक्त केलेले इमारत कामगार यांचे प्रतिनिधी समान संख्येने असतील.कोणत्याही परिस्थितीत बांधकाम कामगारांच्या प्रतिनिधीच्या संख्येपेक्षा मालकाच्या प्रतिनिधीची संख्या अधिक असणार नाही.

समितीमध्ये प्रतिनिधीचा समावेश करण्याबाबत

  • वरिष्ठ अधिकारी,जो संस्थेतील त्याच्या स्थानामुळे समितीच्या कार्यामध्ये प्रभावपणे सहाय्य करू शकेल,तो अध्यक्ष असेल.
  • सुरक्षा अधिकारी समितीचा सचिव असेल.
  • ह्या समितीवरील कामगार प्रतिनिधी हे कामगाराद्वारे निवडले जातील.

सुरक्षा समितीची मुख्य कामे

  • इमारतीच्या किंवा इतर बांधकामातील अपघाताची संभाव्य कारणे आणि असुरक्षित प्रथा ओळखणे आणि सुधारात्मक उपाय सुचविणे.
  • सुरक्षा सप्ताह,सुरक्षा स्पर्धा आणि सुरक्षेवरील भाषणे व चित्रपट यांचे आयोजन करून,पोस्टर तयार करून किंवा आवश्यक असल्यास किंवा गरज भासल्यास तत्सम इतरउपाय करून बांधकाम कामगार आणि नियोक्ता यांच्यामध्ये सूरक्षिततेसंबंधी आवड निर्माण करणे.
  • असुरक्षित पध्दती तपासण्याच्यादृष्टीने आणि असुरक्षित पद्धतीचा तपास लावून,वैद्यकीय प्रथमोपचार आणि कल्याणकारी सुविधासह त्याच्या प्रमानाकरिता सुधारात्मक उपाय सुचविण्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी फेरी मारणे.
  • विविध प्रकारची स्फोटक द्रवे,रसायने आणि इतर बांधकाम सामुग्री हाताळण्याशी संबंधित आरोग्याला असणा-या धोक्यामुळे लक्ष घालते व उचित वैयक्‍तिक सूरक्षात्मक सामुग्रीच्या वापरासह सूधारात्मक उपाय सुचविणे.
  • बांधकामाच्या ठिकाणी कल्याणकारी सुविधामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि इमारतीच्या व इतर बांधकामाच्या ठिकाणी असणारी कामगारांची सुरक्षा, आरोग्य व सुखसोयी अशा इतर संकीर्ण बाबीसाठी उपाय सुचविणे.
  • सुरक्षा समिती ठराविक कालांतराने,कमीतकमी महिन्यातून एकदा एकत्र येईल,आणि बांधकामाच्या ठिकाणी घडणाऱ-या घडामोडीवर संपूर्ण नियंत्रण असणाऱ-या वरिष्ठ वेक्तीद्वारा यांचे अध्यक्षपद भूषविले जाईल.
  • सुरक्षा समितीचे निर्णय आणि शिफारशी यांचे पुरेशा कालमर्यादेमध्ये नियोक्त्याकडून अनुपालन केले जाईल.

सुरक्षा अधिका-याची नेमणूक(नियम २३६)

हे नियम प्रवर्तनात येणा-या सहा महिन्याच्या आत,प्रत्येक आस्थापना हि पाचशे बांधकाम कामगारापेक्षा अधिक असणार नाही इतका रोजगार देईल आणि खाली घालून देण्यात आलेल्या श्रेणीनुसार,बांधकाम कामगारांचा प्रत्येक नियोक्त्या सुरक्षा अधिक-याची नेमणूक करील.

  • १००० निर्माण कामगारापर्यंत -१ सुरक्षा अधिकारी
  • २००० निर्माण कामगारापर्यंत -२ सुरक्षा अधिकारी
  • ५००० निर्माण कामगारापर्यंत -३ सुरक्षा अधिकारी
  • १०,००० निर्माण कामगारापर्यंत -४ सुरक्षा अधिकारी प्रत्येक अतिरिक्त ५,००० निर्माण कामगारापर्यंत किंवा त्याच्या भागाकरिता एक सुरक्षा अधिकारी(अनुसूची सहा)

सुरक्षा अधिका-याची कर्तव्ये

वैयक्‍तिक दुखापतींना प्रतिबंद घालणे,तसेच कामाच्या ठिकाणी सूरक्षित वातावरण निर्माण करणे यांसारख्या सांविधिक तसेच इतर जबाबदा-या पार पाडण्यासाठी सुरक्षा अधिकारी नियोक्त्यास मदत व मार्गदर्शन करील.(अनुसूची सहा)

अपघाताचे वृत्त देणे- (भाग ३९,नियम २३७ )

  • अपघात किंवा धोकादायक घटना ज्या आस्थापनेमध्ये घडली ती आस्थापना जेथे आहे त्या क्षेत्राची अधिकाराकरिता असणारा उप कामगार आयुक्त असा उप कामगार आयुक्त अधिनियमाच्या कलम ३९ अन्वये नियुक्त केलेला प्राधिकारी असेल
  • मंडळ
  • मुख्य निरिक्षका
  • अपघात झालेल्या बांधकाम कामगाराचे निकटतम नातेवाईक किंवा इतर नातेवाईक.
  • इमारतीच्या किंवा बांधकामाच्या ठिकाणी :
  • जीवित हानीस कारणीभूत ठरणा-या,किंवा
  • अपघात घडल्यापासून दहा दिवसापेक्षा जास्त दिवस अशा बांधकाम कामगाराला कामापासून ठरविणा-या अशा कोणत्याही अपघाताची सूचना पुढील वेक्तीना देखील पाठविण्यात येईल.
    • जवळच्या पोलीस ठाण्यावरील प्रभारी अधिकारी.
    • जिल्या दंडाधिकारी किंवा जिल्या दंडाधिका-याची इच्छा असल्यास त्याच्या आदेशानुसार उप विभागीय दंडाधिकारी .

कामगारांचे कर्तव्ये

हे नियम लागू असलेल्या इमारत बांधकामाशी किंवा इतर बांधकामाशी संबंधीत किंवा अनुषंगिक असलेली कोणतीही कार्य किंवा कामे जो हाती घेतो त्या प्रत्येक नियोक्त्याने पुढील गोष्टींचे अनुपालन करणे हे त्याचे कर्तव्य असेल.

  • त्यांच्याशी संबंधित असतील अशा या नियमातील आवश्यक बाबीचे अनुपालन करणे,परंतु कामाच्या कोणत्याही ठिकाणाची उपस्थिती हि त्यांच्या नियोक्त्याच्या वतीने कोणतेही काम पार पाडण्याचा एक भाग नसेल आणि त्याच्या नियोक्त्याने त्याला स्पष्टपणे किंवा गर्भीतार्थाने ते काम करण्यास प्राधिकृत केले नसेल किंवा परवानगी दिली नसेल तर आणि तोपर्यंत कोणत्याही बांधकाम मजुराला या खंडाद्वारे आवश्यक केलेल्या बाबीमुळे बाधा पोहचणार नाही आणि
  • त्याने पार पाडलेल्या किंवा पार पाडणारे असलेल्या कोणत्याही कामाच्या,कृतीच्या किंवा कार्याच्या संबंधात त्याच्याशी संबंधित असतील अशा या नियमाच्या आवश्यक केलेल्या बाबीमुळे बाधा पोहचणार नाही आणि

जो कोणतीही परांची उभारतो किंवा त्यात फेरफार करतो अशा प्रत्येक नियोक्त्याने,परांची उभारण्याच्या वेळी किंवा त्यात फेरफार करण्याच्या वेळी ती ज्या प्रयोजनासाठी किंवा प्रयोजनासाठी तयार केलेली असेल,ते प्रयोजन लक्षात घेता,परांची उभारण्याची किंवा तीमध्ये फेरफार करण्याशी संबधित असतील अशा या नियमाच्या तरतुदीमधील आवश्यक बाबीचे अनुपालन करणे हे त्याचे कर्तव्ये असेल आणि जो या नियमाच्या कोणत्याही तरतुदी लागू असलेले कोणतेही सयंत्र किंवा साधनसामग्री उभारतो.बसवितो,चालवितो किंवा वापरतो असा नियाक्ता,ज्या रीतीने त्या तरतुदीचे अनुपालन करण्यात येते.त्यारीतीने असे सयंत्र किंवा साधनसामग्री उभारिल,बसवील,चालवील,किंवा तिचा वापर करील.

जो हि नियम लागू असलेली कोणतीही कामे किंवा बांधकामे हाती घेतो असा ठेकेदार,सेवा कराराखाली कोणतेही काम काम किंवा सेवा पार पाडण्यासाठी कोणत्याही कारागीरास,व्यापा-यास किंवा इतर व्यक्तीवर परिणाम करतील अशा या नियमाच्या आवश्यक बाबींचे अनुपालन करणे हे त्या ठेकेदाराचे कर्तव्य असेल आणि या प्रयोजनार्थ,या नियमातील कामगाराच्या,व्यापाराच्या किंवा इतर व्येक्तीच्या निर्देशाचा समावेश होईल आणि तो ठेकेदार त्याच्या नियोक्ता असल्याचे समजण्यात येईल.

प्रत्येक कामगाराने,त्याच्या कामाशी किंवा ते काम करण्यापासून दूर राहण्याशी संबंधित असतील अशा या नियमाच्या आवश्यकतांचे अनुपालन करणे आणि नियमाच्या अंमलबजावणीत सहकार्य करणे हे त्याचे कर्तव्ये असेल.

प्रत्येक नियोक्त्याने राज्य शासनाकडून निविर्दीष्ट करण्यात आल्याप्रमाणे इमारतीच्या बांधकामाशी व इतर बांधकामाशी संबंधित असलेल्या सूरक्षितपणे काम करण्यात(सेफ ऑफरेंटिंग) सर्वसाधारणपणे स्वीकृत करण्यात आलेल्या प्रमाण प्रथाच्या तत्वानुसार नसेल अशी कोणतीही गोष्ट करण्यास कोणत्याही कामगारास परवानगी न देणे हे त्याचे कर्तव्य असेल.

कोणताही कामगार,राज्य शासनाकडून निविर्दीष्ट करण्यात आल्याप्रमाणे इमारतीच्या बांधकामाशी व इतर बांधकामाशी संबधित असलेल्या सूरक्षितपणे काम करण्यासंबधात(सेफ ऑफरेटिंग) बाबतीत सर्वसाधारणपणे स्वीकृत केलेल्या प्रमाण प्रथाच्या तत्वानुसार नसेल अशी कोणतीही गोष्ट करणार नाही.

कोणत्याही इमारतीच्या बांधकामाशी संबंधित असलेली कोणतीही व्यक्ती,तिला स्वतःला किंवा इतरांना क्षती पोहचेल अशी कोणतीही कृती हेतूपुरस्कर करणार नाही.

प्रत्येक नियोक्त्याने,या नियमामध्ये दिलेल्या तरतुदीचे अनुपालन न करणारी उदवाही उपयंत्र,उद्वाही गिअर ,उद्वाही साधन,वाहतूक साधनसामुग्री,वाहने किंवा इतर कोणतेही यंत्र किंवा साधन वापरण्यास बांधकाम मजुरांना परवानगी न देणे,हे त्याचे कर्तव्ये असेल.

नियोक्त्याने संडास,मुत्र्या,धुलाईच्या सुविधा व उपहारगृह स्वच्छ व आरोग्यदायी स्थितीत ठेवणे हे त्याचे कर्तव्य असेल.उपहारगृह हे संडास व मुत्र्या आणि प्रदुषित वातावरण यापासून दूर असलेल्या आणि त्याबरोबर बांधकाम मजुरांना सहजपणे जाता येईल अशा ठिकाणी असेल

नियोक्त्याने या नियमा अनुसार एखाद्या कालावधीकरिता वेतन देण्यासाठी त्याने निश्चित केलेल्या व अधिसूचित केलेल्या तारखा पाळणे हे,त्याचे कर्त्यव असेल आणि तो,बांधकाम मजुरांना व निरीक्षकाला सूचना दिल्याशिवाय अशा तारखांमध्ये व कालावधीत कोणताही बदल करणार नाही .नियोक्ता,या नियमान्वव्ये विनीर्दीष्ट केल्याप्रमाणे आणि त्याने अधिसूचित केलेल्या ठिकाणी व वेळेत.बांधकाम मजुरांना वेळेवर प्रधान करण्यात येत आहे याची खात्री करील.जेथे मालक,हा एक ठेकेदार असेल,त्याबाबतीत तो बांधकाम मजुरांना त्याच्या आस्थापनेच्या एका प्रतिनिधीच्या सक्षम किंवा त्याने ज्याच्याकडून कामाचा ठेका घेतला असेल त्या जागेच्या मालकाच्या सक्षम वेतन देण्यात येत आहेयाची खात्री करील आणि वेतन प्रदानाला साक्षी असल्याचे प्रतिक म्हणून अशा प्रतिनिधीची स्वाक्षरी घेईल.

नियोक्त्याने हाती घेतलेल्या इमारतीच्या बांधकामात किंवा इतर बांधकामात वापरले जाणारे उद्वाही उपयंत्र ,उद्वाही गिअर,माती हलविण्याच्या साधनसामग्री,वाहतुकीची साधनसामग्री किंवा वाहने,या नियमान्वये तरतूद केलेल्या,साधनसामग्रीची चाचणी,परिक्षा व तपासणी करण्याच्या संबंधातील आवश्यकता पूर्ण करतात याची खात्री करणे हे,त्याचे कर्तव्य असेल.शासनाच्या किंवा कोणत्याही स्थानिक किंवा इतर सार्वजनिक प्राधिकरणाच्या सेवेतील प्रत्येक व्येक्तीने,या नियमामध्ये दिलेल्या असतील अशा त्याच्याशी संबधीत असलेल्या आवश्यकतांचे अनुपालन करणे हे,तिचे कर्तव असेल.

आस्थापनांची नोंदणी

अस्थापनाची नोंदणी करणे मालकासाठी आवश्यक आहे.(कलम ७ आणि १०)

आस्थापनाची जर नोंदणी केली नसेल,तर इमारत कामगाराने काम करणे मना आहे.

आस्थापना नोंदणी प्रक्रिया(भाग ७)

  • अधिनियमाच्या कलम ७ च्या पोट-कलम(१) मध्ये निर्दिष्ट केलेला अर्ज.ज्या क्षेत्रात आस्थापनेकडून इमारत बांधकाम किंवा इतर बांधकाम करण्यात यावयाचे आहे.अशा अधिनियमाच्या कलम ६ अन्वये नेमून दिलेल्या क्षेत्राच्या नोंदणी अधिका-याकडे या नियमांना जोडलेला नमुना एक मध्ये तीन प्रतीमध्ये करण्यात येईल.
  • पोट-नियम(१) मध्ये निर्दिष्ट केलेल्या प्रत्येक अर्जासोबत आस्थापनेच्या नोंदणीसाठी भरलेल्या फी ची रक्कम दर्शविणारा दर्शनी धनाकर्ष जोडण्यात येईल.

नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी भरावयाची फी खालीलप्रमाणे

अ.नं. कामावर लावायच्या प्रस्तावित मजुरांची संख्या शुल्क(र)
1 ५० पर्यंत असेल र २५० /-
2 ५० पेक्षा अधिक परंतु १०० पेक्षा अधिक नसेल त्याबाबतीत र ५००/-
3 १०० पेक्षा अधिक परंतु ३०० पेक्षा अधिक नसेल त्याबाबतीत र १०००/-
4 ३०० पेक्षा अधिक परंतु ५०० पेक्षा अधिक नसेल त्याबाबतीत र २०००/-
5 ५०० पेक्षा अधिक असेल त्याबाबतीत र २५००/-

आस्थापना अर्ज वैयक्तिक देणे किंवा नोंदणीकृत पोस्टाने नोंदणी अधिकाऱ्याला सोपविणे. महाराष्ट्र शासनाने अधिसूचना दि २६ जून १९९७ ला सहाय्यक कामगार आयुक्त यांची नेमणूक हि नोंदणी अधिकारी म्हणून करण्यात आली. तसेच त्यांना कायद्यानुसार कर्तव्ये बजावणी करावी लागते.

नोंदणी प्रमाणपत्र देणे – नियमानुसार ज्यांची कागदपत्र पूर्ण आहेत त्यांना नोंदणी अधिकारी नोंदणी प्रमाणपत्र हे १५ दिवसात देणे आवश्यक आहे.

नोंदणी प्रमाणपत्र अहस्तांतरणीय असेल.

इमारत आणि इतर कामगार काम सुरु करण्याची सूचना

कलम ४६ नुसार,मालकाला ३० अगोदर त्याच्या नियोजित जागेतील निरिक्षकाला माहिती पुरवणे आवश्यक आहे.

दंड

कलम ४६ नुसारची सूचना मालकाने न दिल्यास ३ महिन्यापर्यत कैद आणि किंवा रु.२००० पर्यंत दंड अशी तरतूद आहे. किंवा दोन्ही.

कामगारांचे आरोग्य आणि सुरक्षेबद्दल मालकाने घ्यावयाची काळजी आणि जबाबदारी

नियोक्ता हा सुरक्षिततेशी संबंधित अधिनियमाचे पालन सुनिश्चित करण्यासाठी बांधकामाच्या कामावर सतत आणि पर्याप्त देखरेख ठेवण्यासाठी जबाबदार असेल आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व व्यवहार्य उपाययोजना करण्यास बांधील असेल. (कलम 40 आणि 44)

कामगार नोंदणी

बांधकाम मजुरांची नोंदणी प्रक्रिया

पात्रता

  • बांधकाम कामगाराचे वय हे १८ वर्ष पूर्ण असावीत पण त्याचे वय हे ६० वर्षापेक्षा जादा नसावे.
  • जो कोणी मागील १२ महिन्यांच्या कालावधीत किमान ९० दिवस कोणत्याही इमारत किंवा इतर बांधकामाच्या कामात गुंतलेला आहे.

अर्जाचा नमुना

नाव नोंदणी अर्ज नमुना मंडळाने प्राधिकृत केलेल्या अधिका-याकडे सादर करण्यात येईल.(नमुना ५)(नमुना ५)

नोंदणी करावयाच्या अर्जासोबत खालील कागदपत्रे असावीत.

  • मंडळाद्वारे निश्चित केलेले शुल्क (मंडळाच्या ठरावानुसार रु. २५ दिनांक _______________)
  • वयाबाबतचा पुरावा जन्माचा दाखला /शाळेचा दाखला/आधार कार्ड/ मतदान ओळखपत्र/ राशन कार्ड पासपोर्ट/ सक्षम वैदकीय दाखला.
  • विद्यमान नियोक्त्याचे प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकारातील छायचित्राच्या ३ प्रती.

ओळखपत्र

  • लाभार्थी म्हणून बांधकाम कामगाराची नोंदणी झाल्यावर मंडळ प्रत्येक लाभार्थीला ओळखपत्र देईल
  • प्रत्येक नियोक्त्याने लाभार्थ्याच्या ओळखपत्रात केलेल्या इमारत आणि इतर बांधकामाच्या कामाचा तपशील नोंदवावा, त्यास प्रमाणित करावे आणि ते लाभार्थ्यास परत द्यावे.

इमारत व इतर बांधकाम कामगार उपकर कल्याण कायदा,१९९६

इमारत आणि बांधकाम कामगार कल्याण उपकर अधिनियम,१९९६(रोजगार व सेवाशर्ती नियमन) अनुसार केंद्र शासनास उपकाराची टक्केवारी ठरवनेबाबतच्या असलेल्या अधिकारान्वये केंद्र शासनाच्या कामगार मंत्रालयाने अधिसूचना क्र.एसओ २८९९,दि २६ सप्टेंबर ,१९९६ अन्वये एक टक्का दराने इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण उपकर गोळा करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. त्या अनुषंगाने राज्यामध्ये एक टक्का उपकर बांधकामाच्या एकूण मूल्यानुसार राज्यातील इमारत व इतर बांधकाम नियोक्त्याकडून संबंधित उपकर वसुली अधिकारी यांनी मूळ स्त्रोतातून उपकर वसुली करण्याबाबतची सूचना परिपत्रका देण्यात आल्या आहेत.

उपकर अधिनियासाठी तयार केलेले नियम

केंद्र सरकारने इमारत आणि बांधकाम कामगार कल्याण उपकर नियम १९९८,कलम १४ च्या अनुसार उपकर वसुली बंधनकारक आहे.
केंद्र अधिनियमाच्या कलम ३ व नियम ४ नुसार केंद्र शासनाने बिलातून १% उपकर कपात करण्याबाबत निर्गमित केलेल्या अधिसूचनेच्या अनुषंगाने कपात केलेल्या उपकराची रक्कमेचा धनाकर्ष महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,यांच्या खात्यात जमा करावयाचा आहे.
उपकर नियमाच्या नियम,४(४) अनुसार जेथे बांधकामाकरिता स्थानिक संस्थेची मजुरी आवश्यक आहे. तेथे अशा मजुरीकरिता प्राप्त झालेल्या प्रत्येक अर्जासोबत मंडळाच्या नावे उपकारासंबंधिचा रेखांकित धनाकर्ष(एका वर्षाच्या बांधकामाच्या अंदाजित खर्चाच्या १% रक्कम एवढा) सदर स्थानिक संस्थेस सादर करणे आवश्यक आहे.

उपकर वसुली च्या प्रयोजनासाठी नियम ३ मध्ये दिलेले आहे

इमारत व इतर बांधकाम कामगार,बांधकाम मुल्ल्याचे मूल्यमापन हे मूल्यांकन अधिकारी(महाराष्ट्र शासन द्वारा अधिसूचित )करेल.कलम ५ व नियम ७, अनुसार.

  • जमीनीची किंमत
  • कोणतेही नुकसान भरपाई दिलेली आहे किंवा कामगाराला दयायचे किंवा त्याच्या परिवारास देय,कामगार मोबदला अधिनियम,१९२३

कल्याणकारी मंडळ

कामगार अधिनियमाच्या अंतर्गत योजना, या अधिनियमानुसार उपकर वसूल केला जातो. त्यासाठी मंडळाची स्थापना केली जाते.तसेच इमारत व इतर बांधकाम कामगार यांना सुरक्षा,आरोग्य आणि कल्याणकारी योजना दिल्या जातात.

महाराष्ट्र शासन अधिसूचना क्र.DCA-2009/CR-8/7A दि. १ मे २०११ ला "इमारत व इतर बांधकाम कल्याण मंडळ" ची स्थापना केली आहे.(कलम १८ चे पोट कलम(१) अनुसार)

मंडळाचे कार्य

  • बांधकाम मजुरांची लाभार्थी म्हणून नोंदणी.
  • लाभार्थींना ओळखपत्र देणे.
  • लाभार्थीची नोंदवही ठेवील.
  • इमारत कामगाराचे अंशदान एकत्र करणे,लाभार्थी काही कारणामुळे योगदान देऊ शकला नाही.तरी त्याला ३ महिन्यापर्यत माफ केले जाते.
  • लाभार्थीसाठी योजना बनविणे आणि योजना कार्यान्वित करणे.

उपकराची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया

प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मालकाने ३० दिवसाच्या आत उपकर भरणे आवश्यक आहे. किवा मूल्यमापन केल्यानंतर ३० दिवसाच्या आत उपकर भरणे आवश्यक आहे.(नियम ४)

कामगार विभाग

महाराष्ट्र शासन

उपयुक्त दुवे

  • उत्तरदायित्वास नकार आणि धोरणे
  • मदत
  • वापरसुलभता
  • साईटमॅप
  • अभिप्राय
  • संपर्क - SOP

जलद दुवे

  • कायदे व नियम
  • शासन निर्णय
  • अर्ज व डाउनलोड
  • बालमजुरी थांबवा
  • सतत विचारले जाणारे प्रश्न
  • तक्रारी
  • नागरीकांची सनद
  • किमान वेतन
  • नवीन कोड आणि नियम
  • बांधकाम कामगार
  • घरेलू कामगार
  • ग्राहक किंमत निर्देशांक

वेबसाइट अभ्यागत

  • एकूण दर्शक : 48598
  • आजचे दर्शक : 167
  • शेवटचे अद्यतन: : 07-11-2025
© कामगार आयुक्त, महाराष्ट्र शासन, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञानद्वारा संचालित

हा दुवा बाह्य संकेतस्थळावर नेणारा आहे. त्या बाह्य संकेतस्थळावरील माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी कामगार विभाग संकेतस्थळ हे जबाबदार नाही, हे कृपया लक्षात असू द्या.

बंद करा बाह्य संकेतस्थळावर जा