अस्तित्वात असणारे विवाद/तंटे यांच्यामध्ये परिणामकारक आणि समयानुकुल हस्तक्षेप करून समझोता करणे जेणेकरून औद्योगिक शांततेचे पालन केले जाईल.
तांत्रिक कामगार कायद्या व्यतिरिक्त केंद्रीय आणि राज्य कामगार कायद्याची, कारखाना कायदा , १९४८ व भारतीय बाष्पके कायदा, १९२३ यांची अंमलबजावणी.
धोकादायक प्रक्रियांसाठी काम करणा-या बालकामगारांची मुक्तता करण्यासाठी विशेष प्रयत्न.
असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षितता आणि योग्य मजुरीची हमी.
जलद, विश्वासार्ह आणि पारदर्शक प्रणाली देण्यासाठी आमची कटिबद्धता आणि जनतेमध्ये कामगार कायदा बद्दल जागरूकता निर्माण करणे.
वरील सर्व कार्यांसमवेत कामगार आयुक्तांचे कार्यालय, मुंबई खालील गोष्टीची सुध्या जबाबदारी घेते.
महाराष्ट्रातील १० श्रमजीवी केंद्रांतील ग्राहक किंमत निर्देशक क्रमांकाचे संकलन.
राहणीमान, वेतनभत्ता, विविध प्रकारच्या उद्योगामध्ये असणा-या कल्याणकारी आणि सुरक्षितता प्रणाली.
विविध योजना, माथाडी आणि सुरक्षितता कामगार मंडळ, कुटुंब कल्याण योजना यांचे सामाजिक – आर्थिक सर्वेक्षण आणि महाराष्ट्रातील ५ केंद्रांतील क्रमांकाचे संकलन.

हा दुवा बाह्य संकेतस्थळावर नेणारा आहे. त्या बाह्य संकेतस्थळावरील माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी कामगार विभाग संकेतस्थळ हे जबाबदार नाही, हे कृपया लक्षात असू द्या.