Search
|
Government of India
  • दिशादर्शकाकडे जा
  • मुख्य विषयाकडे जा
  • अ-
  • अ
  • अ +
  • अ
  • अ
  • English
  • लॉगिन करा
Labour Department
कामगार आयुक्त महाराष्ट्र शासन
  • Shri. Devendra Fadnavis

    श्री. देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

  •  Shri. Eknath Shinde

    श्री. एकनाथ शिंदे माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

  • Shri. Ajit Pawar

    श्री. अजित पवार माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

  • Shri. Akash Fundkar

    श्री. आकाश फुंडकर मंत्री (कामगार)

  • Shri. Ashish Jaiswal

    श्री. आशिष जयस्वाल राज्यमंत्री (कामगार)

  • Smt. I. A. Kundan (IAS)

    श्रीमती. आय.ए. कुंदन (भाप्रसे ) प्रधान सचिव कामगार विभाग

  • Dr. H. P. Tummod (IAS)

    डॉ. एच. पी. तुम्मोड (भाप्रसे) कामगार आयुक्त

  • मुख्यपृष्ठ
  • संचालनालय
    • कामगार विभाग
      • आमच्याबद्दल
      • उद्दिष्टे
      • मिशन
      • संकल्प
      • विभागवार संघटन
      • विभागाचे कार्य
    • कामगार आयुक्त
      • आमच्याबद्दल
      • उद्दिष्टे
      • मिशन
      • दृष्टीकोन
      • कार्य
      • अंदाजपत्रक
      • विभागवार संघटन
      • प्रादेशिक कार्यालये
      • माथाडी मंडळ
      • सुरक्षा रक्षक मंडळ
      • संपर्क
    • विकास आयुक्त (असंघटीत कामगार)
      • असंघटित कामगार
    • औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय
    • बाष्पके संचालनालय
    • कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था
    • महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ
    • BOCW
  • सेवा
    • कामगार आयुक्त सेवा
    • बाष्पके संचालनालय सेवा
      • संस्थेबद्दल
      • सेवा
      • त्वरित लिंक्स
    • औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय सेवा
    • कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था सेवा
  • नवीन काय आहे
  • मीडिया गॅलरी
    • छायाचित्र दालन
    • व्हिडिओ गॅलरी
  • निरीक्षण
  • निविदा
    • महा निविदा
    • विभागाच्या निविदा
    • GEM पोर्टल
  • परिपत्रके / अधिसूचना
  • लोकसेवा हक्क अधिनियम
  • माहिती अधिकार अधिनियम
  • 100 दिवस कार्यक्रम अहवाल
  • संपर्क
Labour Banner

संस्थेबद्दल

  1. तुम्ही आता येथे आहात
  2. मुख्य पृष्ठ
  3. संस्थेबद्दल

Boiler बाष्पक म्हणजे ज्या बंद पात्र साधनात दाबाखाली बाष्प निर्मीती होते. हे बाष्प ऑईल मिल, वस्त्र उद्योग, रासायनिक उद्योग, पेट्रोकेमिकल्स, रिफायनरिज (कच्चे खनिज तेल), दुग्ध/खादय व्यवसाय, हॉटेल उद्योग, विजनिर्मीती इत्यादीसाठी वापरली जाते. या सर्व उद्योगात बाष्पकांची गरज भासते. जरी बाष्पक हा अत्यंत उपयोगी असला तरी त्याच्या स्फोटकतेमुळे तो धोकादायक ठरु शकतो. अपघात हे बाष्पकाच्या स्फोटामुळे होतात व त्यामुळे जिवीत व वित्त हानी होऊ शकते. इ.स.१८६९ मध्ये मुंबईत झालेल्या दोन बाष्पक अपघातात जिवीत व वित्त हानी झाली. म्हणुन इ.स.१८६९ मध्ये मुंबई येथे बाष्पक निरीक्षण विभागाची स्थापना करण्यात आली आणि त्यानंतर भारतीय बाष्पक अधिनियम १९२३, राष्ट्रीय पातळीवर अंमलात आला.

त्यानंतर भारत सरकारने 'भारतीय बाष्पक विनियम १९२४' अंमलात आणले व हे विनियम इ.स.१९५० मध्ये 'भारतीय बाष्पक विनियम १९५०' असे बदलण्यात आले. हया विनियमात बाष्पक नकाशे, बांधणीचा प्रकार, नोंदणीकरण, निरीक्षण, नेमून दिलेले प्रमाणपत्र हया इत्यादी संबंधीचे मार्गदर्शन समाविष्ट केलेले आहे. या नंतर 'भारतीय बाष्पक अधिनियम १९२३' वर आधारित 'महाराष्ट्र बाष्पक नियम १९६२' आणि 'महाराष्ट्र मितोपयोजक नियम १९६५' अस्तित्वात आले.

Boilerभारतीय बाष्पक अधिनियम इ.स. २००७ मध्ये सुधारीत होऊन 'बाष्पक अधिनियम १९२३' असा करण्यात आला. नंतर मार्च - २०११ मध्ये 'बाष्पक परिचर नियम २०११' व 'बाष्पक परिचलन अभियंता नियम २०११' असे अस्तित्वात आले.

संचालकांचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. विभागीय कार्यालये पुणे, नागपूर, अहमदनगर, कोल्हापूर, नाशिक व सोलापूर येथे आहेत.

बाष्पकाची कायदयात्मक व्याख्या

राष्ट्रीय हिताकरीता, जीव आणि मालमत्तेचे संरक्षण आणि संवर्धन करणे, तसेच राष्ट्रीय विकासाला गती देण्यास मदतीकरीता, बाष्पक संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत अंमलबजावणी होणारे अधिनियम/नियम/विनीयम खालीलप्रमाणे :

  • बाष्पक अधिनियम, १९२३ (180 KB)
  • भारतीय बाष्पक विनियम, १९५०
  • महाराष्ट्र बाष्पक नियम, १९६२ (169 KB)
  • महाराष्ट्र मितोपयोजक नियम, १९६५ (108 KB)
  • बाष्पक परिचर नियम, २०११ (139 KB)
  • बाष्पक परिचलन अभियंता नियम, २०११ (125 KB)

  • बाष्पकाच्या सुरक्षेच्या, श्रेष्टत्वाची वृध्दीकरीता वापरात असलेल्या बाष्पकाचे काटेकोरपणे तपासणी आणि जिवित व मालमत्तेचे, बाष्पकाच्या स्फोटांपासून संरक्षण आणि जतन.
  • राष्ट्रीय विकासाच्या वृध्दीकरीता, बाष्पकांचे उत्पादना दरम्यान काटेकोरपणे निरीक्षण करणे.
  • बाष्पकांच्या सुरक्षित वापराकरीता, बाष्पक परिचर आणि परिचलन अभियंत्यांची परीक्षा घेऊन, सक्षम मनुष्यबळ तयार करणे.
  • गतिमान, पारदर्शक सार्वजनिक देय व्यवस्थेच्या वचनबध्दतेसाठी, प्रक्रियांचे सुलभीकरण आणि संगणकासह, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे.
  • बाष्पक आणि प्रेशर वेसल्स यांची निर्मिती, तपासणी आणि अपघातांचे विश्लेषण, या क्षेत्रांमधील अग्रगण्य निरीक्षण संस्था असे श्रेष्टत्व जोपासण्याकरीता, आंतरराष्ट्रीय संस्थांशी बरोबरी करणे.
  • सुपर क्रिटीकल बाष्पकांची निर्मिती/निरीक्षण, या क्षेत्रामध्ये आधुनिक पध्दतीचा विकास करणे.
  • सौर उर्जेवर चालणा-या बाष्पकांची निर्मिती करणा-या संस्थांना मदत आणि प्रोत्साहन देणे.
  • बाष्पक संबंधी समूहामध्ये बाष्पकाच्या सुरक्षित आणि सक्षमपणे वापराकरीता, जनजागृती निर्माण करणे.

हा विभाग वरील नेमून दिलेली कामे गेली १५० वर्षे यशस्वीरित्या करीत आहे. आधुनिक काळाबरोबर बदललेल्या जागतिक तंत्रज्ञानामुळे, आधुनिक सुधारणा हया विभागाने अवलंबिल्या आहेत. हा विभाग वरील सर्व कामे आद्यापावेतो हाताने करीत आहे. तथापी हया विभागाची भविष्यातील दृष्टी खालिलप्रमाणे आहे.

  • विभागाचे संपूर्ण संगणकीकरण.
  • सुधारीत सक्रीय संकेतस्थळाचे जाळे (वेब).
  • नागरी सेवा पुरविण्यासाठी, तात्कालीक पध्दतीचे सुलभीकरण आणि पारदर्शकतेची जोपासना करणे.
  • हया विभागातर्फे देण्यात येणा-या काही सेवा 'एक खिडकी' योजने खाली उद्योग सेतु व्दारे उपलब्ध असतील.
  • नागरीकांच्या तक्रारी/सुचना प्राप्त करण्याकरीता व्यवस्थेचा विकास करणे.
  • नागरीकांची मते आजमावण्याकरीता व्यवस्थेचा विकास करणे.
  • बाष्पक ते प्रेशर वेसल्स निर्मीती, तपासणी आणि अपघाताचे विश्लेषण या क्षेत्रामध्ये अग्रगण्य निरीक्षण संस्था प्राप्त करण्याच्या उद्यीष्टाकरीता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करुन आंतरराष्ट्रीय तपासणी संस्थांची बरोबरी करणे.
  • सुपर क्रीटीकल बाष्पक, ज्यामध्ये बाष्पक व पाणी यांची घनता समान असते, अशा बाष्पकांचे उत्पादन उभारणी, नोंदणी व तपासणीकरीता तंत्राचा विकास करणे. अपारंपारीक उर्जेच्या वापराला प्रोत्साहन देऊन सौर उर्जेवर चालणारे बाष्पक उत्पादन करणा-या संस्थांना मदत व प्रोत्साहन देणे.
  • बाष्पक अधिनियम, १९२३ आणि त्यामधील सुधारणा संबंधी जनजागृतीसाठी मुंबई मुख्य कार्यालयासह प्रादेशिक कार्यालयांमध्ये जनजागृती उपक्रम राबवणे.

Organization Structure

Regional Offices details chart
नोंद: सर्व विभागीय कार्यालयांचे पत्ते संपर्क पृष्ठावर आहेत.

बाष्पक संचालनालयाकडुन खालील प्रमाणे सेवा कार्ये करण्यात येतात.:

  • नोंदणी : बाष्पक व मितिपयोजकांची नोंदणी.
  • निरीक्षण : वार्षिक तसेच तत्कालिक निरीक्षण.
  • मान्यता : निर्मात्यांनी सादर केलेले उष्णता प्रक्रिया तसेच इतर चाचण्यांचे अहवाल.
  • सूट किंवा सवलत देणे : नियमांतर्गत सूट देणे.
  • मान्यतेचे नुतनीकरण.
  • बदल (मालकी) : महाराष्ट्र राज्यातून दुस-या राज्यांत किंवा दुस-या राज्यातून महाराष्ट्रात आलेल्या बाष्पक/मितोपयोजकांचे स्थलांतर.
  • मालकी बदल : कोणत्याही मालकी बदलाच्या संदर्भात.
  • स्क्रप (तुकडे करणे): बाष्पकांचे तुकडे करुन स्कॅप करणे.
  • सांध्यात्यांची परीक्षा : सांधात्याची परीक्षा घेणे.

अधिक माहितीसाठी

  • बाष्पक अधिनियम, १९२३
  • महाराष्ट्र बाष्पक नियम, १९६२

 

बाष्पकेसंचालनालय, 7वा मजला, प्लॉट क्रं.सी-20,
ब्लॉक-ई, वांद्रेकुर्लाकॉम्पलेक्स, वांद्रेपुर्व,
मुंबई-400 051
दूरध्वनी क्रमांक : 022 26571198 / 26571304 / 26571352
फॅक्स क्रमांक : 022 26571283
ई मेल : 1) dsbmumbaiho[at]gmail[dot]com 2) jtdirsb[dot]mumbai[at]maharashtra[dot]gov[dot]in

अ. क्र. नाव पदनाम
1 श्री. ध. प्र. अंतापूरकर संचालक
2 रिक्त सहसचांलक
3 श्री. ग. दा. वानखेडे उपसंचालक
4 श्री. वि. म. बारमाटे उपसंचालक
5 श्री. बं. भा.इंगळे उपसंचालक
6 श्री. सं. श. सोळंके उपसंचालक
7 श्री. म.रा. देशमुख उपसंचालक
8 रिक्त उपसंचालक
9 रिक्त उपसंचालक
10 रिक्त उपसंचालक
11 रिक्त उपसंचालक
12 रिक्त उपसंचालक
13 श्री. न. सो. कांबरे प्रभारी तांत्रिक अधिकारी
14 श्री. न. सो. कांबरे वरिष्ठ तांत्रिक अधिकारी
15 श्री. न. सो. कांबरे कनिष्ठ तंत्र सहायक
16 सौ. स.र. वायळ कनिष्ठ तंत्र सहाय्यक
17 श्री. प. म. कदम कनिष्ठ तंत्र सहाय्यक
18 रिक्त कनिष्ठ तंत्र सहाय्यक
19 रिक्त कनिष्ठ तंत्र सहाय्यक

संपर्क प्रत पहा / डाउनलोड करा (31 KB)

बाष्पकेसंचालनालय, गाला नं.4,
उद्योगभवन, आय.टी.आय.च्या बाजूला, त्रंबकरोड, सातपूर,
नाशिक-422 007
दूरध्वनी क्रमांक :0253-2351016
फॅक्स नंबर : 0253-2365357
ई मेल : 1) steamboilernsk[at]bsnl[dot]in 2) jtdirsb[dot]nashik[at]maharashtra[dot]gov[dot]in

अ. क्र. नाव पदनाम
1 श्री. उ. शं. मदने प्र. सह संचालक ( अतिरिक्त कार्यभार )
2 श्री. उ. शं. मदने उपसंचालक

बाष्पके संचालनालय, सहकार भवन, पहिला मजला,
आदर्शनगर, पुणे-सातारारोड,
पुणे-411037
दूरध्वनी क्रमांक :020-24261697
ई मेल : 1) jdsbPune[at]rediffmail[dot]com 2) jtdirsb[dot]pune[at]maharashtra[dot]gov[dot]in

अ. क्र. नाव पदनाम
1 श्री. उ. न. पाटील सहसंचालक
2 श्री. अ. मा. झुंझरे उपसंचालक
3 श्री. मु. शा. शेख उपसंचालक
4 रिक्त उपसंचालक
5 रिक्त उपसंचालक
6 श्री. यो. मा. कुंभार कनिष्ठ तंत्र सहायक
7 श्री. पि. ज्ञा. दडवे कनिष्ठ तंत्र सहायक

बाष्पके संचालनालय, हरेश, 16, बिजली को-ऑप.हौसिंग सोसायटी,
शिलाविहार जवळ, वसंत टेकडी,
अहमदनगर – 414 003
दूरध्वनी क्रमांक : 0241-2421745
ई मेल : 1) jdsb_anr[at]bsnl[dot]in 2) jtdirsb[dot]ahnedbagar[at]maharashtra[dot]gov[dot]in

अ. क्र. नाव पदनाम
1 श्री. न.ग. भोईटे सहसंचालक
2 श्री. सं. स. कुंभार उपसंचालक

बाष्पके संचालनालय, 1, भगवाघर ले आउट, धरमपेठ,
नागपूर – 440 010
दूरध्वनी क्रमांक : 0712-2621170
ई मेल : 1) jdblrngp[at]gmail[dot]com 2) jtdirsb[dot]nagpur[at]maharashtra[dot]gov[dot]in

अ. क्र. नाव पदनाम
1 श्री. ध. प्र. अंतापूरकर प्र.सहसंचालक ( अतिरिक्त कार्यभार )
2 श्री. स. ग. चौधरी उपसंचालक

बाष्पके संचालनालय, जुना राजवाडा, भवानीमंडप,
कोल्हापूर – 416 002
दूरध्वनी क्रमांक :0231 2542920
ई मेल : 1) boiler_kop[at]dataone[dot]in 2) jtdirsb[dot]kolhapur[at]maharashtra[dot]gov[dot]in

अ. क्र. नाव पदनाम
1 श्री. सं. ना. चिवटे सहसंचालक
2 रिक्त उपसंचालक
3 रिक्त उपसंचालक

बाष्पके संचालनालय, वितराम व्हरटिकस, पहिला मजला, पेटोलपंपासमोर,
83-ए, रेल्वेलाईन्स, डफरिनचौक,
सोलापूर – 413 001
दूरध्वनी क्रमांक : 0217 – 2317015
ई मेल : 1) inssbssol[at]bsnl[dot]in 2) jtdirsb[dot]solapur[at]maharashtra[dot]gov[dot]in

अ. क्र. नाव पदनाम
1 श्री. सं. दि. मानकर सहसंचालक
2 रिक्त उपसंचालक

बाष्पक परिचालन अभियंता नियम 2011 व बाष्पक परिचर नियम 2011 व त्यामधील सुधारणांनुसार हया संचालनालयामार्फत बाष्पक परिचालन अभियंता व बाष्पक परिचर यांकरीता परिक्षा घेतल्या जातात यामुळे महाराष्ट्र राज्यात कुशल बाष्पक परिचालन अभियंता व बाष्पक परिचर निर्माण होतात.

तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध् होउन बाष्पक सुरक्षित व कार्यक्षमतेने वापरण्यास मदत होते.

  • सुचना
    • प्रथम श्रेणी बाष्पक परिचारक परीक्षा सुचना (952 KB)
    • व्दितीय श्रेणी बाष्पक परिचारक परीक्षा सुचना (936 KB)
    • स्वयं साक्षांकनासाठी स्वयं घोषणापत्र- प्रपत्र-ब​ (75 KB)
    • बाष्पक प्रचालक अभियंता परीक्षा सुचना (21.8 KB)
  • वैदयकीय/सेवा प्रमाणपत्राचा नमुना
    • बाष्पक प्रचालक अभियंता सेवा प्रमाणपत्र (67 KB)
    • बाष्पक परिचारक सेवा प्रमाणपत्र (268 KB)
    • वैदयकीय प्रमाणपत्र (31.2 KB)
  • बाष्पक परिचालन नियम, 2011. (125 KB)
  • बाष्पक परिचर, नियम, 2011. (139 KB)
  • नियमात झालेल्या सुधारणा.
    • बॉयलर पिरचर दुरुस्ती नियम 2016 (137 MB)
    • बॉयलर ऑपरेशन अभियंता पिरचर दुरुस्ती नियम 2016 (171 MB)
    • बाष्पक परिचालन नियम, 2011. (2.71 MB)
    • बाष्पक परिचर, नियम, 2011. (572 KB)
    • बाष्पक परिचर (सुधारीत) नियम, 2012 दि. 09-05-2014 (2.71 MB)
    • बाष्पक परिचर (सुधारीत) नियम, 2014 दि. 11-08-2014 (527 KB)
    • बाष्पक परिचालन अभियंता नियम, 2011, स्पष्टीकरण दि. 18-03-2014 (573 KB)
    • बाष्पक परिचालन अभियंता नियम, 2011, स्पष्टीकरण दि. 20-08-2014 (918 KB)
  • प्रश्नपत्रिका
    • बाष्पक प्रचालक अभियंता परीक्षा प्रश्नपत्रिका फेब्रुवारी 2012 (3.23 MB)
    • बाष्पक प्रचालक अभियंता परीक्षा प्रश्नपत्रिका ऑक्टोबर 2012 (3.91 MB)
    • बाष्पक प्रचालक अभियंता परीक्षा प्रश्नपत्रिका सप्टेंबर 2013 (4 MB)
    • बाष्पक प्रचालक अभियंता परीक्षा प्रश्नपत्रिका जुलै 2014 (3.99 MB)
    • बाष्पक प्रचालक अभियंता परीक्षा प्रश्नपत्रिका 7 फेब्रुवारी 2015 (2.9 MB)
    • बाष्पक प्रचालक अभियंता परीक्षा प्रश्नपत्रिका नोव्हेंबर 2016 (453 KB)
    • बाष्पक प्रचालक अभियंता परीक्षा प्रश्नपत्रिका फेब्रुवारी 2017 (675 KB)
    • बाष्पक प्रचालक अभियंता परीक्षा प्रश्नपत्रिका मार्च 2018 (663 KB)
  • परीक्षेचा अर्ज (121 KB)
  • परीक्षेच वेळापत्रक
    • प्रथम श्रेणी बाष्पक परिचर क्षमता परीक्षा पात्र उमेदवारांची यादी (70 KB)
    • द्वितीय श्रेणी बाष्पक परिचर क्षमता परीक्षा पात्र उमेदवारांची यादी (74 KB)
    • प्रथम व द्वितीय श्रेणी बाष्पक परिचर क्षमता परीक्षा ऑगस्ट २०१९ चे वेळापत्रक
    • बाष्पक परिचालन अभियंता प्रमाणपत्र परीक्षा
  • निकाल

कामगार विभाग

महाराष्ट्र शासन

उपयुक्त दुवे

  • उत्तरदायित्वास नकार आणि धोरणे
  • मदत
  • वापरसुलभता
  • साईटमॅप
  • अभिप्राय
  • संपर्क - SOP

जलद दुवे

  • कायदे व नियम
  • शासन निर्णय
  • अर्ज व डाउनलोड
  • बालमजुरी थांबवा
  • सतत विचारले जाणारे प्रश्न
  • तक्रारी
  • नागरीकांची सनद
  • किमान वेतन
  • नवीन कोड आणि नियम
  • बांधकाम कामगार
  • घरेलू कामगार
  • ग्राहक किंमत निर्देशांक

वेबसाइट अभ्यागत

  • एकूण दर्शक : 53147
  • आजचे दर्शक : 1304
  • शेवटचे अद्यतन: : 09-11-2025
© कामगार आयुक्त, महाराष्ट्र शासन, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञानद्वारा संचालित

हा दुवा बाह्य संकेतस्थळावर नेणारा आहे. त्या बाह्य संकेतस्थळावरील माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी कामगार विभाग संकेतस्थळ हे जबाबदार नाही, हे कृपया लक्षात असू द्या.

बंद करा बाह्य संकेतस्थळावर जा