श्री. देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. एकनाथ शिंदे माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. अजित पवार माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. आकाश फुंडकर मंत्री (कामगार)
श्री. आशिष जयस्वाल राज्यमंत्री (कामगार)
श्रीमती. आय.ए. कुंदन (भाप्रसे ) प्रधान सचिव कामगार विभाग
डॉ. एच. पी. तुम्मोड (भाप्रसे) कामगार आयुक्त
लघु उद्योजकांना बाष्पकाची आवश्यकता असते व ते लहान औद्योगिक बाष्पक वापरतात. ते चांगल्या प्रकारची वाफ तयार करतात आणि इतर बाष्पकांपेक्षा कार्यक्षम असतात. लहान बाष्पकांना बाष्पक चालविणा-या व्यक्तीची गरज भासत नाही हे सर्वात उपयुक्त आहे.
सर्व बाष्पकांची, बाष्पके संचालनालयाचे अधिका-यांकडून वार्षिक तत्वावर तपासणी केली जाते. बाष्पकांचे प्रकार व मर्यादा असते, जसे की शेल टाईप बाष्पकाची पाण्याची क्षमता आणि वापर दाब मर्यादित आहे, जसे ५०० लि. पाणी आणि वापर दाब ७ कि. ग्राम/चौ.से.मी. पर्यंत अनुक्रमे आहे. पाण्याचा टयूब (वॉटर टयूब टाईप) बाष्पकात १५० लिटर पाणी व वापर दाब १२ कि.ग्राम/चौ.से.मी. पर्यंत अनुक्रमे आहे.
ज्या बाष्पकांची पाणी धारण क्षमता २५ लिटर किंवा त्यापेक्षा जास्त आहे व तयार होणा-या वाफेचा दाब १ कि.ग्र./सें.मी.२ किंवा पाण्याचे तापमान १०० अंश सेलिसयस किंवा त्यापेक्षा जास्त आहे
बाष्पकाची नोंदणी करण्याकरिता संचालक, बाष्पके महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना विनंती अर्ज सादर करावा. अर्जा सोबत भारतीय बाष्पके विनियम, १९५० मधील विविध दाखले. तसेच त्यानुसार बाष्पकाचा तपशील व विहित शुल्क भरलेले चलन जोडावे.
या कायदयाला बाष्पके कायदा १९२३ असे संबोधले जाते. हा केंद्र शासनाचा कायदा, भारतातील सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश (जम्मु व काश्मीर वगळून) लागू आहे. बाष्पक निर्मितीसाठी, तसेच बाष्पक वापरासाठी कायदयातील तरतुदीनुसार भारतीय बाष्पके विनियम १९५० तयार करण्यात आले आहेत.
भारतीय बाष्पक विनियम, १९५० मधील प्रकरण - १४ नुसार तयार झालेल्या कॉईल टाईप बाष्पके, ज्यांची पाणी धारण क्षमता १५० लिटर असुन, कमाल वापरदाब १२ कि.ग्र/सें.मी.२ एवढा आहे. शेल टाईप बाष्पके, ज्यांची पाणी धारण क्षमता ५०० लिटर असून, कमाल वापरदाब ७ कि.ग्र/सें.मी.२ आहे. अशी बाष्पके बाष्पक परिचराच्या अधिपत्याखाली असणे आवश्यक नाही. तथापि असे बाष्पके दहावी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांच्या अधिपत्याखाली असणे आवश्यक आहे.
ज्या संयंत्रामध्ये पाण्याचे तापमान जास्तीत जास्त १०० अंश सेंटीग्रेड पर्यंत वाढविले जाते. त्यास पाणी गरम करणारे संयंत्र म्हणतात व त्याची नोंदणी करणे आवश्यक नाही. परंतु ज्या संयंत्रामध्ये पाण्याचे तापमान १०० अंश सेंटीग्रेड पेक्षा जास्त वाढविले जाते. अशा संयंत्रांना वाफ तयार करणारे संयंत्र म्हणतात व त्यांची बाष्पके अधिनियम १९२३ नुसार नोंदणी करणे आवश्यक आहे अथवा या संचालनालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.
बाष्पकाच्या भागांवरील आच्छादीत इन्सुलेशन व लॅगिंग काढून करण्यात येणा-या निरीक्षणास उघडया स्वरुपातील निरीक्षण म्हणतात. असे निरीक्षण बाष्पक निर्मितीपासून प्रत्येक दहा वर्षांनी करण्यात येते.
शेल टाईप बॉयलरमध्ये बाष्पकाचे वय २५ वर्षे झाल्यावर त्याचा वापरदाब भारतीय बाष्पके विनियम १९५० मधील विनियम ३९१ - अ (अ) (१ ) (२) मध्ये दिलेल्या तक्त्यानुसार कमी करावा.
वॉटर टयुब बॉयलर्स जे ४०० अंश सेंटीग्रेड किंवा त्यापेक्षा जास्त तापमानावर चालतात तेव्हां अशा बाष्पकाचे १,००,००० तास चालल्यानंतर भारतीय बाष्पके विनियम १९५० मधील विनियम ३९१ (अ) (बी) (२ ) मधील तक्ता - १ नुसार करावे आणि इतर सर्व वॉटर टयुब बॉयलर्स २५ वर्षेनंतर त्याच्या तक्ता - २ नमुद केलेल्या चाचंण्या घेण्यात याव्यात.
वरील परीक्षा संचालक बाष्पके यांच्याकडून घेण्यात येतात. परिक्षासंबंधी सर्व अटी व शर्ती बाष्पक परिचर नियम, २०११ व बाष्पके परिचालन अभियंता नियम २०११ मध्ये दिल्या आहेत.
बाष्पक परिचालन अभियंता परिक्षा वर्षातून दोन वेळा मे आणि डिसेंबर महिन्यात मुंबई येथे घेण्यात येते. बाष्पक परिचर परिक्षा वर्षातून पाच वेळा घेण्यात येतात पैकी मुंबई येथे तीन वेळा (फेब्रूवारी, जुन व ऑक्टोबर) व नागपूर येथे दोन वेळा (मार्च व सप्टेंबर) अशा घेण्यात येतात.
सांधाता चांचण्या मान्यताप्राप्त तंत्र प्रयोगशाळेत घेण्यात येतात. जसे मेटालर्जि कल सर्विसेस, घाटकोपर, मुंबई, नेशनल टेस्ट हाऊस, कोलकाता आणि वेल्डींग रिसर्च इन्स्टिट्यूट तीरुचरापल्ली.
सदर यादी या संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बाष्पदाबमापी बाष्पके संचालनालय, मुंबई तसेच विभागीय कार्यालय, पुणे येथे रु. ५० रु- प्रती, एवढे शुल्क आकारुन तपासून मिळेल.
प्रमाणपत्राच्या दुस-या प्रतीच्या प्रत्येक प्रतीसाठी रु.५० - एवढे शुल्क आकारण्यात येते.
महाराष्ट्र बाष्पके नियम १९६२ मधील नियम-१६ आणि नियम-४3 नुसार संचालकांच्या विशेष परवानगीने सुटीच्या दिवशी अथवा सूर्यास्तानंतर विशेष भेट आयोजित करता येते. तथापि त्यासाठी लागणारे शुल्क विहीत शुल्काच्या दुप्पट असते.
ज्या कंपनीस बाष्पक किंवा त्याचे सुटे भाग बनवावयाचे आहेत अशी कंपनी विहीत शुल्कासह संचालकांकडे अर्ज सादर करु शकते.
जे बाष्पक क्रिटीकल बाष्पदाब व त्या दाबापेक्षा जास्त दाबावर कार्य करते त्याला सुपर क्रिटीकल बाष्पक म्हणतात. बाष्पाचे क्रिटीकल दाब 22.064 मेगा पास्कल व क्रिटीकल तापमान 373.9460C आहे. या क्रिटीकल पॉईंटवर बाष्पाची लॅटेंट हिट शून्य असते तसेच पाणी व बाष्पाच्या घनतेमध्ये काहीच फरक नसतो. भविष्यामध्ये अशा प्रकारचे बाष्पके, महाराष्ट्रात विज निर्मिती करता वापरले जातील.
अपघात टाळण्यासाठी सर्व अधिका-यांना बाष्पक / बाष्पकाच्या भागांची तपासणी (निरिक्षण) करत्यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने सुचित करण्यात येते की, मे. घरडा केमिकल कंपनीत एक अधिकारी बाष्पकाचे निरिक्षण करत्यावेळी बाष्पकात पडले आणि जखमी झाले. तेव्हा सर्व अधिका-यांच्या नियुक्तीनंतर बाष्पकाचे निरीक्षण करतेवेळी घ्यावयाच्या सावधगिरी बाबत मार्गदर्शन द्यावयाचे आहे. तेव्हा खालीलप्रमाणे सर्व अधिका-यांनी त्यांच्या सुरक्षाच्या दृष्टीने सावधगिरी बाळगावी.

हा दुवा बाह्य संकेतस्थळावर नेणारा आहे. त्या बाह्य संकेतस्थळावरील माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी कामगार विभाग संकेतस्थळ हे जबाबदार नाही, हे कृपया लक्षात असू द्या.