श्री. देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. एकनाथ शिंदे माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. अजित पवार माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. आकाश फुंडकर मंत्री (कामगार)
श्री. आशिष जयस्वाल राज्यमंत्री (कामगार)
श्रीमती. आय.ए. कुंदन (भाप्रसे ) प्रधान सचिव कामगार विभाग
डॉ. एच. पी. तुम्मोड (भाप्रसे) कामगार आयुक्त
आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने (आय.एल.ओ. ने) निर्धारित केलेले विविध कामगार कायद्यांचे मालकांकडून पालन होते आहे किंवा नाही, त्याचप्रमाणे औद्योगिक संबंधांविषयीची कार्ये व कर्तव्ये, कामगार कल्याणाच्या विविध योजना, सामाजिक सुरक्षिततेविषयीच्या विविध योजना, इत्यादींचे पालन व्यवस्थितपणे होत आहे किंवा नाही, हे पाहण्याची जबाबदारी कामगार आयुक्त कार्यालयावर असते. कामगार विभागाने विशेष अधिकारी नियुक्त केलेले आहेत व त्यांना केंद्र सरकार व राज्य शासन या दोन्हीद्वारे लागू केले गेलेल्या निरनिराळ्या कायद्यांच्या व नियमांच्या अंतर्गत विविध कार्यकारी अधिकार दिलेले आहेत.
राज्य शासनाने उद्योगांत व व्यवसायांत गुंतवणुकीस व उद्योजकतेस पोषक असे वातावरण उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिलेले आहे. कामगार विभागाच्या अंमलबजावणी यंत्रणेमार्फत विविध कामगार कायद्यांची कठोरपणे अंमलबजावणी करून त्यायोगे कामगार वर्गाचे अधिकार संरक्षित करण्याचे काम केले जाते. या संदर्भामध्ये देशात एक आदर्श राज्य म्हणून प्रस्थापित होणे, हे महाराष्ट्र शासनाचे उद्दिष्ट आहे.

हा दुवा बाह्य संकेतस्थळावर नेणारा आहे. त्या बाह्य संकेतस्थळावरील माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी कामगार विभाग संकेतस्थळ हे जबाबदार नाही, हे कृपया लक्षात असू द्या.