असंघटीत कामगारांसाठीच्या विविध मंडळांकडून त्यांच्या सर्व कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही, यावर लक्ष देणे व त्यावर नियंत्रण ठेवणे.
शासनास वेळोवेळी आवश्यक ती माहिती व सल्ले पुरविणे.
काही तातडीच्या प्रकरणांविषयी चर्चा करण्यासाठी संबंधित कल्याण मंडळास मंडळाची बैठक घेण्याच्या सूचना देणे.
मंडळाच्या बैठका नियमितपणे भरवण्याकडे लक्ष देणे.
मंडळाच्या विविध निर्णयांची अंमलबजावणी करण्याकडे लक्ष देणे.
विकास आयुक्तांच्या निदर्शनास आलेल्या उणीवा व अनियमितताभरून काढण्याकरीता आवश्यक ती पावले उचलणे.
कोणत्याही योजनेतील तरतुदींचा लाभ संबंधित लाभार्थींना होतो आहे किंवा नाही, याकडे लक्ष देणे.
सर्व नमुना, नोंदवह्या, कागदपत्रे, व माहिती सुस्थितीत ठेवल्या जात आहेत किंवा नाही, याकडे लक्ष पुरविणे.
कोणत्याही योजनेशी संबंधित योग्य ती माहिती आवश्यक त्या टिपण्यासह व शे-यांसह व स्पष्टीकरणासह अमलात आणले जात आहेत किंवा नाही याकडे लक्ष पुरविणे.
हा दुवा बाह्य संकेतस्थळावर नेणारा आहे. त्या बाह्य संकेतस्थळावरील माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी कामगार विभाग संकेतस्थळ हे जबाबदार नाही, हे कृपया लक्षात असू द्या.