श्री. देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. एकनाथ शिंदे माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. अजित पवार माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. आकाश फुंडकर मंत्री (कामगार)
श्री. आशिष जयस्वाल राज्यमंत्री (कामगार)
श्रीमती. आय.ए. कुंदन (भाप्रसे ) प्रधान सचिव कामगार विभाग
डॉ. एच. पी. तुम्मोड (भाप्रसे) कामगार आयुक्त
उदिष्टे
महाराष्ट्र राज्यातील घरेलू कामगारांच्या कल्याणास चालना देण्यासाठी मंडळे स्थापन करण्याकरिता तसेच त्या कामगारांना विविध वित्तीय लाभ देण्यासाठी निधी निर्माण करण्याकरिता आणि त्याच्याशी संबंधित व तदनुषंगिक बाबींकारिता तरतूद करणे इष्ट आहे.
कल्याणकारी मंडळ स्थापनेच्या अंमलबजावणीचा कायदा(भाग ३)
महाराष्ट्र राज्यातील घरेलू कामगारांच्या कल्याणास चालना देण्यासाठी मंडळे स्थापन करण्याकरिता तसेच त्या कामगारांना विविध वित्तीय लाभ देण्यासाठी निधी निर्माण करण्याकरिता आणि त्याच्याशी संबंधित व तदनुषंगिक बाबींकारिता तरतूद करणे इष्ट आहे.
राज्य शासनास,एक सल्लागार समिती स्थापन करता येईल आणि सल्लागार समिती या अधिनियमाची अंमलबजावणी करताना उदभवणा-या किंवा घरेलू कामगारांना व मालकांना या अधिनियमाच्या तरतुदी लागू करण्यासंबंधातील किंवा विविध मंडळाच्या कामाच्या समन्वयासंबंधातील ज्या बाबी सल्ला देण्यासाठी राज्य शासन तिच्याकडे सल्ल्यासाठी पाठवील त्या बाबींवर हि समिती शासनास सल्ला देईल. सल्लागार समिती स्थापनेची अधिसूचना महाराष्ट्र सरकारने २३ ऑगस्ट २०११ ला दिली.
सल्लागार समितीमध्ये,मालक,घरेलू कामगार यांचे प्रतिनिधीत्व करणारे सदस्य यांची संख्या समसमान असेल आणि ती तिच्या एकूण सदस्य संख्येच्या एक तृतीयांशपेक्षा अधिक असणार नाही.
घरेलू कामगार मंडळ नाव नोंदणीसाठी शिबीर घेतात.घरेलू कामगार नाव नोंदणी फी.३० रु.व वार्षिक फी ६० रु. आहे.लाभार्थी म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी नोंदणी नं.देवून बायोमेट्रिक मशीनद्वारे नाव नोंदणी केली जाते.त्यानंतर एक आठवड्यांनंतर घरेलू कामगार मंडळामध्ये जावून ओळखपत्र/स्मार्ट कार्ड घ्यावे.
"घरेलू कामगार" याचा अर्थ असुरक्षित तसेच घरेलू काम करण्याकरिता ठेवण्यात आलेला कामगार असा आहे.घरेलू कामगार यांचे काम हे अंशकालीन स्वरूपाचे असते.व ते एका पेक्षा जास्त मालकाकडे काम करतात.
कामगार आणि मालक याचे संबंध हे अंशकालीन स्वरूपाचे आहे.त्यांच्या कामाचे तास हे ठराविक नसतात.त्यांच्याकडून जास्त काम करून घेतले जायचे.जसजसे शहरामध्ये लोकसंख्या वाढत गेली तसतसे घरेलु काम करणा-या महिलाची कामगार संख्या वाढत गेली. सर्वेनुसार अंदाजे १.५ दशलक्षां पेक्षा जास्त कामगार हे घरेलू काम करतात. तसेच सर्वेनुसार मालकांची हि संख्या ४ ते ५ दशलक्ष महाराष्ट्रात आहे.घरेलू कामगार हे कायद्याच्या कोणत्याच भागांमध्ये येत नाहीत.तसेच त्यांना काही लाभ मिळावा.यासाठी महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे कि,घरेलू कामगार हे कायद्याच्या एका भागात येतील त्यासाठी एक कायदा बनविला त्या अधिनियमास महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम २००८ असे म्हणतात.

हा दुवा बाह्य संकेतस्थळावर नेणारा आहे. त्या बाह्य संकेतस्थळावरील माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी कामगार विभाग संकेतस्थळ हे जबाबदार नाही, हे कृपया लक्षात असू द्या.