उद्दिष्टे

  • (अ) कामगार आयुक्त, माथाडी कामगार व सुरक्षा रक्षक मंडळांसहित, (ब) असंघटीत क्षेत्रातील कामगारांचे विकास आयुक्त, (क) संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य (ड) संचालक, बाष्पके (ई) महाराष्ट्र कामगार अभ्यास संस्था (फ) कामगार कल्याण मंडळ, आणि (ग) कामगार व औद्योगिक न्यायालये, या सर्व कार्यालयांमार्फत कामगार कायदे, नियम, व विविध योजना यांची आखणी व अंमलबजावणी करणे.
  • औद्योगिक संबंध सलोख्याचे राहतील, तसेच औद्योगिक क्षेत्रामध्ये शांतता राहील याकडे लक्ष देणे, त्याचप्रमाणे कामगार कल्याणासाठी आवश्यक त्या योजना राबविणे.
  • राज्यातील औद्योगिक क्षेत्र व सेवा क्षेत्रांमध्ये कामगार कायद्यात व इतर कामगारविषयक धोरणांमध्ये सुधारणा व दुरुस्त्या करणे, त्याचप्रमाणे दीर्घकालीन कामगार कल्याण व हित यांकडे लक्ष पुरविणे.
  • असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी विविध योजना राबविणे, तसेच विविध धोरणे आखणे व त्यांची अंमलबजावणी करणे. असंघटीत क्षेत्रातील घरगुती कामगार, बांधकाम क्षेत्रातील कामगार, सफाई कामगार, शेतमजूर, व यांसारख्या अन्य सर्व कामगारांचा समावेश होईल याकडे लक्ष पुरविणे. एकूण कामगारांपैकी ९०% कामगार हे असंघटीत क्षेत्रामध्ये आहेत.
  • राज्य विधिमंडळातील चर्चा व वादविवाद यांकरिता आवश्यक ते सहाय्य पुरविणे तसेच विविध विधीनियमांना मंजुरी देणे.
Go to Navigation