कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था

उद्दिष्टे

  • शिक्षण, संशोधन व प्रशिक्षण, यांच्या माध्यमातून कामगार क्षेत्रातील सर्व संबंधित घटकांचा व्यावसायिक दर्जा उंचावणे, तसेच विविध कामगार कायदे प्रभावीपणे व्यवहारात आणण्यासाठी श्रमिक अभ्यासांचे प्रशिक्षण देणे.
  • सामाजिक कार्याची कामगार कल्याणास लागू होत असलेली तत्वे व प्रणाली, इत्यादींविषयी मुलभूत प्रशिक्षण देणे.
  • कामगार कल्याण कार्य व औद्योगिक संबंध, या क्षेत्रांतील सिद्धांत व उपयोजन या विषयी व्यावसायिक शिक्षण प्रदान करणे. तसेच, कामगार कल्याणाच्या क्षेत्रातील प्रशिक्षणार्थींमध्ये कौशल्ये व व्यावसायिक दृष्टीकोन, यांचा विकास करणे.
  • कामगार कल्याणाच्या कामास एक यशस्वी व्यवसाय करण्याच्या दिशेने, तसेच त्या क्षेत्रात व्यावसायिक स्थान व दर्जा मिळवण्याच्या दिशेने, कामगार कल्याण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना आवश्यक ते सहाय्य करणे.
  • कामगार क्षेत्रातील सामाजिक समस्यांचा शास्त्रीय अभ्यास करणे व अशा अभ्यासास प्रोत्साहन देणे. त्याचप्रमाणे, अशा प्रकारच्या अभ्यासाच्या परिणामांचे व निरीक्षणांचे योग्य त्या माध्यमातून प्रकाशन करणे.
Go to Navigation