कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था

संचालक प्रोफाइल

डॉ. आर.एम. तुंगारे सध्या कै. नारायण मेधाजी लोखंडे महाराष्ट्र श्रमविज्ञान संस्था (महाराष्ट्र शासन), परळ, मुंबई-१२, या संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. श्रमविज्ञान क्षेत्रात शिक्षण, प्रशिक्षण, व संशोधन, या कार्यांना वाहिलेली ही एक राज्यस्तरीय संस्था आहे.

त्यांनी एम.ए. (अर्थशास्त्र), एम.बी.ए., आणि पी.एचडी, या पदव्या मिळवलेल्या आहेत. विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली, यांनी त्यांना पी.एचडी. मिळवण्याकरिता शिक्षक शिष्यवृत्ती बहाल करून गौरवलेले आहे. त्याचप्रमाणे, त्यांना त्यांच्या स्नातक अभ्यासक्रमापर्यंत राज्य शासनाकडून विशेष गुणवत्ता शिष्यवृत्तीदेखील प्राप्त होत होती.

सन १९८१-८२ आणि १९८२-८३ या कालावधीत डॉ. तुंगारे मुंबई विद्यापीठाच्या महाविद्यालय विकास परिषदेचे सदस्य म्हणून कार्यरत होते. महाविद्यालय विकास परिषद ही मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांच्या विकासाच्या दृष्टीने काम करणारी एक परिषद आहे. सन २०११ मध्ये त्यांना महामहीम राज्यापालांद्वारे मुंबई विद्यापीठाच्या नियामक मंडळावर (सिनेटवर) नामित करण्यात आले.

त्यांनी आजवर विविध विद्यापीठांच्या नियामक मंडळांचे सदस्य म्हणून काम पहिले आहे. त्यांमध्ये मुंबई विद्यापीठाचे श्रमविज्ञान विषयातील एतदर्थ मंडळ, पुणे विद्यापीठाची शैक्षणिक परीक्षण समिती, श्री.ना.दा.ठा. विद्यापीठाचे व्यवस्थापन शास्त्रातील एतदर्थ मंडळ, तसेच शिवाजी विद्यापीठाचे बँकिंग व वित्त विषयातील अभ्यास मंडळ, इत्यादींचा समावेश होतो.

त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत, आणि मुंबई विद्यापीठ संचालित, अर्थशास्त्रातील पहिला नेतृत्व विकास कार्यक्रम पूर्ण केलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी कार्मिक व प्रशिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी प्रायोजित केलेला, आणि यशदा, पुणे, या संस्थेद्वारे उच्चपदस्थ शासकीय अधिका-यांसाठी चालवला गेलेला "जेंडर रिलेशनल फ्रेमवर्क" हा कार्यक्रमही पूर्ण केलेला आहे.

डॉ. तुंगारे यांनी १९८६ साली जागतिक अर्थशास्त्र परिषद, नवी दिल्ली, या परिषदेत भाग घेतला. सदर परिषदेत त्यांनी "उद्योग" या विषयातील त्यांचे सादरीकरण केले. विकास अर्थशास्त्र आणि श्रमिक अर्थशास्त्र, हे त्यांचे सध्याचे स्वारस्याचे विषय आहेत.

Go to Navigation