कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था

संचालक संदेश

डॉ. आर. एम. तुंगारे

संचालक, कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था

जगभरातील अर्थव्यवस्था अत्यंत वेगाने विश्वव्यापी अर्थव्यवस्थेत अंतर्भूत होत आहेत. अभूतपूर्व परिवर्तनाने, नवीनतम बदलांनी, आणि स्पर्धात्मक बाजारव्यवस्थांनी परिपूर्ण असलेल्या या युगात, द्रष्टे नेतृत्व की आजच्या काळाची गरज होऊन बसलेली आहे. आजच्या मानव संसाधन विकास क्षेत्रातील व्यावसायिकाला एका क्रांतिकारक परिवर्तकाची आणि द्रष्टयाची भूमिका निभवावी लागते. त्याला परिवर्तनाचा एक उत्तेजक व प्रोत्साहक म्हणून वावरावे लागते, तसेच भविष्यात येऊ घातलेली आव्हाने समयोचितपणे ओळखणारी दूरदृष्टी लाभलेल्या, आणि त्या आव्हानांना कृतीशीलपणे सामोरे जाणा-या नेत्याचे गुणही अंगी बाळगावे लागतात.

"कै. नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रमविज्ञान संस्था कामगार व्यवस्थापनशास्त्राला आवश्यक तो अग्रक्रम देऊन, आणि कोणताही व्यवसाय यशस्वीपणे चालवण्यात कामगार वर्गाचा सिंहाचा वाटा असतो हे विचारात घेऊन, तिच्या विद्यार्थांना सदैव बदलणा-या बाजारस्थितीतील उद्योगक्षेत्राच्या आजच्या आवश्यकता ओळखणारी दृष्टी देते."

अन्य मानव संसाधन अभ्यासक्रमांपेक्षा श्रमविज्ञान शास्त्राचे वेगळेपण हे आहे की, त्याच्या अभ्यासक्रमात औद्योगिक संबंध आणि मानव संसाधन विकास, या दोन्ही विषयांचा एक अद्वितीय संगम केला गेला आहे. या अभ्यासक्रमात छापील संकल्पनांबरोबरच प्रत्यक्ष क्षेत्र कार्याचाही समावेश केला गेला आहे. क्षेत्र कार्यात प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष ज्ञान मिळवण्याकरिता केवळ खाजगी कंपन्यांनाच नव्हे, तर इतर विविध सरकारी संस्थांनाही नियमित निरीक्षण भेटी देऊन, त्यांची आकलनशक्ती व निर्णयक्षमता वाढवली जाते.

श्री. गुलझारीलाल नंदा यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नातून उभी राहिलेली कै. नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रमविज्ञान संस्था सध्या नेतृत्व आणि कामगार व्यवस्थापन क्षेत्रातील तिच्या दैदिप्यमान कारकीर्दीच्या ६४ व्या वर्षात कार्यरत आहे.

कामगार संघटनांच्या सक्रीय कार्यकर्त्यांकरिता "कामगार संघटना व औद्योगिक संबंध" या विषयातील नऊ महिने कालावधीचा पदविका अभ्यासक्रम संस्थेने आयोजित केला आहे. राज्य शासनाने चालविलेला हा अभ्यासक्रम त्याच्या प्रकारातील एकमेव अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमासाठी विविध उद्योगांमधील व्यवस्थापनांकडून व कामगार संघटनांकडून प्रायोजित असून, त्यासाठी सदर संस्थांद्वारे व संघटनांद्वारे प्रशिक्षणार्थी नामनिर्देशित करण्यात येतात.

उद्योग क्षेत्रातील विविध लाभधारक, उदाहरणार्थ उद्योग, कामगार संघटना, शासन, आणि विविध व्यावसायिक संस्था, यांच्याशी संस्थेच्या होत असलेल्या विचार आदान-प्रदानातून संस्थेला तिचे सामर्थ्य मिळत असते.

मी सर्व इच्छुक प्रशिक्षणार्थींना व लाभधारकांना विनंती करतो, की संस्थेने चालविलेल्या विविध अभ्यासक्रमांपासून त्यांनी लाभ करून घ्यावा.

आपणा सर्वांस,
माझ्या हार्दिक शुभेच्छा.
डॉ. आर. एम. तुंगारे,
(एम.ए., एम.बी.ए., पी.एचडी.)
(संचालक, कै. नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रमविज्ञान संस्था)

Go to Navigation