कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था

कोर्सेस

कै. नारायण मेधाजी लोखंडे महाराष्ट्र श्रमविज्ञान संस्थेने चालविलेल्या अभ्यासक्रमांचा तपशील

कामगार संघटना व औद्योगिक संबंध या विषयातील पदविका

कामगार संघटनांतील सक्रीय कार्यकर्त्यांकरिता संस्थेद्वारे "कामगार संघटना व औद्योगिक संबंध" या विषयातील नऊ महिने कालावधीचा पूर्णवेळ पदविका अभ्यासक्रम चालविला जातो. हा एक बहुविषयक कार्यक्रम असून त्यात अर्थशास्त्राची विविध क्षेत्रे, औद्योगिक संबंध, विधी, संस्थेतील वर्तन, औद्योगिक समाजशास्त्र, कामगार संघटना, इत्यादी विषयांचा समावेश होतो. कामगार संघटनांत मध्यम स्तरावर कार्यरत असणा-या विविध पदाधिका-यांकरिता या अभ्यासक्रमात माहिती पुरविली जाते.

ग्रामीण श्रमविज्ञान केंद्र

ग्रामीण श्रमविज्ञान केंद्रातर्फे ग्रामीण भागात उपलब्ध असलेल्या श्रमांविषयी अद्ययावत माहिती व ज्ञान पुरवण्याकरिता आवश्यक ते अभ्यासक्रम चालविले जातात. त्याचप्रमाणे या केंद्राद्वारे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणा-या समाजसेवकांकरिता सामायिक स्वारस्याच्या विषयांत ग्रामीण नेतृत्वाचे प्रशिक्षणही देण्यात येते.

पी.एचडी. कार्यक्रम, मुंबई विद्यापीठ

श्रमविज्ञान विषयातील पी.एचडी. साठीचे मार्गदर्शन केंद्र म्हणून संस्थेस मुंबई विद्यापीठाकडून मान्यता मिळाली आहे. याद्वारे औद्योगिक क्षेत्र व संस्था, यांच्यातील परस्पर सहयोगास व विचारांचे आदान-प्रदानास चालना मिळणे अपेक्षित आहे. डॉक्टरेट साठी अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांनी सामाजिक व आर्थिक विकासाची धोरणे आखण्याच्या दिशेने सहाय्यभूत ठरणा-या विविध विषयांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे.

मास्टर ऑफ लेबर स्टडीज (एम.एल.एस.)

एम.एल.एस. हा दोन वर्षे कालावधीचा पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम चालविण्यात येतो. मुंबई व नागपूर येथे अनुक्रमे मुंबई व नागपूर विद्यापीठाशी संलग्न

Go to Navigation