महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ

दृष्टीकोन

मुंबई जिल्ह्यातील अनेक गिरण्यातील, उद्योगांमधील, तसेच आस्थापनांतील कर्मचारी व गिरणी कामगार यांच्याकडे त्यांच्या कामाच्या वेळेच्या व्यतिरिक्त काही मोकळा वेळ मिळत असे. उदाहरणार्थ, जेवणाची सुट्टी, चहापानाची सुट्टी इत्यादी. अर्थातच, या फावल्या वेळेत ते दुर्मार्गांकडे वळत. ते कर्मचारी व गिरणी कामगार मद्यपान किंवा जुगार खेळण्याकडे आकर्षित व आसक्त होत. जेव्हा शासनाने अशा कामगारांकडे बारकाईने लक्ष दिले तेव्हा असे निदर्शनास आले कि ते चुकीच्या मार्गाला लागलेले आहेत. म्हणून असा निर्णय घेण्यात आला कि त्या कामगारांना फावल्या वेळेत काही सकारात्मक गतीविधींमध्ये व्यस्त करून ठेवावे.

या एकमेव उद्देशाने सर्व कामगार कल्याण मंडळांची स्थापना करण्यात आली.

  • महाराष्ट्र राज्यातील विविध सामाजिक स्तरातील सर्व नोंदणीकृत कामगारांना सर्वोच्च दर्जाच्या कल्याणकारी सुविधा पुरविण्यात अग्रगण्य राहणे, तसेच सदर कामगार व त्यांच्या कुटुंबियांना समाधानकारक दर्जाच्या कल्याणकारी योजना उपलब्ध करून देणे, ज्यायोगे त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, व मानसिक जीवन समृद्ध होईल.
Go to Navigation