महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ

आमच्याबद्दल

Overview मुंबई कामगार कल्याण अधिनियम, १९५३, दिनांक १७ जून १९५३ रोजी अमलात आणला गेला. सदर अधिनियम हे एक महत्वाचे पाऊल आहे, कारण त्यातील तरतुदींचे लाभ केवळ कामगारांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांनादेखील होतात. अशा प्रकारचा विधिविधान अस्तित्वात असल्यामुळे महाराष्ट्रातील कामगार एका त-हेने सुदैवी आहेत.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ही मुंबई कामगार कल्याण निधी अधिनियम, १९५३, अन्वये विधिवत स्थापित करण्यात आलेली एक संस्था आहे. सदर मंडळ त्यातील कल्याण केंद्रांच्या मार्फत कामगार कल्याणाच्या विविध योजना राबविते. त्यांमध्ये, माहिती केंद्रे चालविणे, ग्रंथालये व वाचनालये चालविणे, बालवाडया व शिशुमंदिरे चालविणे, शिवणकाम, भरतकाम, हस्तकला वर्ग, मैदानी व बैठे खेळ, मनोरंजन, शैक्षणिक व मनोरंजनाचे कार्यक्रम चालविणे, दृक-श्राव्य माध्यमे, प्रदर्शने, आरोग्यविषयक कार्यक्रम, इत्यादींचा समावेश होतो.

दैनंदिन कार्यकलापांव्यतिरिक्त, काही प्रासंगिक कार्यकलाप, जसे की राष्ट्रीय व इतर सण साजरे करणे, विविध खेळ, स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन करणे, इत्यादी कार्ये केली जातात. अशा कार्यक्रमांमध्ये कामगार, त्यांचे कुटुंबीय, तसेच अन्य व्यक्ती मोठया प्रमाणात सहभागी होतात.

Go to Navigation