आंतरराज्य स्थलांतरीत कामगार (रोजगाराचे नियमन आणि सेवाशर्ती) अधिनियम, १९७९
हा अधिनियम आंतरराज्य स्थलांतरित कामगारांच्या नियुक्तीचे नियमन करतो, व त्यांच्या सेवाशर्ती व त्यांशी संबंधित अन्य बाबींविषयी तरतुदी करतो. त्याचप्रमाणे, नोंदणी अधिका-याची नियुक्ती, काही विशिष्ट आस्थापनांची नोंदणी, नोंदणी न करता करण्यात आलेल्या आंतरराज्य स्थलांतरित
कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध, परवाना जारी करणारी प्राधिकृती, इत्यादींच्याही तरतुदी करतो. तसेच हा अधिनियम आंतरराज्य स्थलांतरित कामगारांच्या वेतनाचे दर आणि इतर सेवाशर्ती, यांचेही नियमन करतो.