कामगार आयुक्त

मोटार परिवहन कामगार अधिनियम, १९६१

नोंदणी

पाच किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कामावर ठेवणार्‍या सर्व सार्वजनिक परिवहन संस्थांनी नोंदणीचे प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक आहे.

Application for Registration

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अ. क्र. शीर्षक डाउनलोड
1 आवश्यक तो फॉर्म PDF(28 KB)

आवश्यक बाबी

 • आस्थापना सध्या बंद असल्यास, सदर अर्ज काम सुरु होण्याच्या अंदाजे तारखेच्या ३० दिवसांपर्यंत भरण्यात येत आहे काय?
 • आस्थापनेचे काम चालू असल्यास, हा अर्ज काम सुरु केल्यापासून ६० दिवसांच्या आत भरण्यात येत आहे काय?
 • आस्थापनेमध्ये ५ किंवा त्यापेक्षा अधिक कामगार कामावर आहेत काय ?
 • अर्जासाठी विहित नमुन्यातील फॉर्म १ भरावा
 • फॉर्म १ दोन प्रतींमध्ये सादर करावा
 • कृपया अर्ज संपूर्णपणे आणि अचूकपणे भरावा.
 • चलन किंवा शुल्काची पावती सोबत जोडलेली आहे काय?
 • आवश्यक ते शुल्क अदा करण्यात आले की नाही याची खात्री करून घ्या.
 • फॉर्म १ मधील मुद्दा क्रमांक ६ मध्ये सूचित केलेल्या सर्व वाहनांची क्षेत्रीय परिवहन अधिकार्‍याकडून मिळालेल्या नोंदणी प्रमाणपत्राची (आर.सी.ची) प्रत सोबत जोडावी.
 • भागीदारी विलेख / सामंजस्याचा करार सोबत जोडावा.

टीपा

 • अर्जदारास इ-मेलद्वारे किंवा एस.एम.एस द्वारे सूचना पाठवली जाते. त्यासाठी आपला इ-मेल आयडी तसेच मोबाईल नंबर नमूद करावा.
 • आपल्या संदर्भासाठी, द्वैभाषिक नमुना माहिती भरलेला एक फॉर्म आपल्या संदर्भासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. उजव्या बाजूच्या वरच्या कोप-यातील हेल्प लिंकवर क्लिक करून तो फॉर्म पाहू शकता.
 • सादर करण्यापूर्वी प्रिंट फॉर्म वर क्लिक करून त्या फॉर्मची प्रत संग्रहित करून ठेवा..
Go to Navigation