परवाना नोंदणी आणि ग्रँट
"महाकामगार" च्या माध्यमातून आपल्या कारखान्याची नोंदणी ऑनलाईन कशी करावी
"महाकामगार" च्या माध्यमातून आपल्या कारखान्याची नोंदणी ऑनलाईन करण्यासाठी आम्ही आपल्याला सहाय्य करू.
प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.
अ. क्र. |
शीर्षक |
डाउनलोड |
1 |
आवश्यक तो फॉर्म |
(62
KB) |
2 |
जाहीर निवेदन |
(125
KB) |
आवश्यक बाबी
- फॉर्म २ - र १०/- चा कोर्ट फी स्टँप लावावा
- परवाना मिळवण्यासाठी / परवान्याचे नुतनीकरण करण्यासाठी कलम ६ व ७ मध्ये नमूद केल्याप्रमाणे नोंदणीसाठीचा अर्ज व भोगवटयाची सूचना
- घोषणा पत्र
- चालान / शुल्क भरल्याची पावती
- विजेचे देयक
- वास्तूच्या मालकीचा पुरावा (मालकीचे/भाडेतत्वावरील, इत्यादी)
- भोगवटादाराच्या निवासाचा पुरावा
- सार्वजनिक मर्यादित कंपनी असल्यास
- संघटनेचा करार, संचालक मंडळाची यादी व त्यांचे निवासी पत्ते.
- कोणत्याही एका संचालकास 'भोगवटादार' म्हणून नियुक्त करण्याबाबत संचालक मंडळाचा निर्णय.
- भागीदारी व्यवसाय असल्यास
- नोंदणीकृत भागीदारी विलेख
- एका भागीदारास भोगवटादार बनवण्यास अन्य भागीदारांकडून "ना हरकत" प्रमाणपत्र.
अधिका-यांच्या निरीक्षणानंतर व मंजुरी मिळाल्यानंतर आपल्या कारखान्यास परवाना देण्यात येईल.
- अर्जदारास इ-मेलद्वारे अथवा एस.एम.एस.द्वारे सूचित करण्यात येईल. त्यासाठी आपला इ-मेल आयडी व मोबाईल क्रमांक येथे दर्ज करावा, ही विनंती.
- द्वैभाषिक नमुना माहिती भरलेला एक फॉर्म आपल्या संदर्भासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या अर्जाच्या उजव्या बाजूच्या वरील कोप-यातील "हेल्प" वर क्लिक करून आपण सदर फॉर्म अभ्यासू शकता.
- हा अर्ज सादर करण्यापूर्वी "प्रिंट फॉर्म" वर क्लिक करून या अर्जाची एक प्रत छापून घ्या.