कामगार आयुक्त

आंतरराज्य स्थलांतरीत कामगार (रोजगाराचे नियमन आणि सेवाशर्ती) अधिनियम, १९७९

परवाना - आंतरराज्य स्थलांतरित कामगार

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अ. क्र. शीर्षक डाउनलोड
1 आवश्यक तो फॉर्म PDF(25 KB)

आवश्यक बाबी

 • अर्जासाठी विहित नमुन्यातील फॉर्म भरावा
 • कृपया अर्ज संपूर्णपणे आणि अचूकपणे भरावा.
 • कंत्राटदाराचे ओळखपत्र सोबत जोडलेले आहे काय?
 • कंत्राटदाराच्या वयाचा दाखला सोबत जोडलेला आहे काय? (व्यक्तींच्या बाबतीत)
 • अर्जात नमूद केलेले कामगार जेथे कामास आहेत, त्या आस्थापनेचे नाव व पत्ता
 • आस्थापनेचे नोंदणी प्रमाणपत्र
 • प्रमुख नियोक्त्याचा तपशील नमूद केलेला आहे काय?
 • साईटवरील कंत्राटदाराच्या व्यवस्थापकाचा तपशील सोबत जोडलेला आहे काय?
 • कंपन्यांच्या बाबतीत, संचालकांचा / भागीदारांचा तपशील सोबत जोडलेला आहे काय?
 • आस्थापनेच्या नियंत्रणासाठी व पर्यवेक्षणासाठी जबाबदार असलेल्या अन्य व्यक्तींचा तपशील सोबत जोडलेला आहे काय?
 • रु. १००/- च्या मुद्रांकावरील घोषणापत्र सोबत जोडलेले आहे काय?
 • लागू असलेले शुल्क अदा केलेले आहे काय?
 • चलन / शुल्काची पावती सोबत जोडलेली आहे काय?
 • कामगारांचा तपशील सोबत जोडलेला आहे काय?
 • प्रमुख नियोक्त्याची स्वाक्षरी असलेला मूळ फॉर्म क्रमांक ६ (प्रमुख नियोक्त्याचे प्रमाणपत्र) सोबत जोडलेले आहे काय?

टीपा

 • अर्जदारास इ-मेलद्वारे किंवा एस.एम.एस द्वारे सूचना पाठवली जाते. त्यासाठी आपला इ-मेल आयडी तसेच मोबाईल नंबर नमूद करावा.
 • आपल्या संदर्भासाठी, द्वैभाषिक नमुना माहिती भरलेला एक फॉर्म आपल्या संदर्भासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. उजव्या बाजूच्या वरच्या कोप-यातील हेल्प लिंकवर क्लिक करून तो फॉर्म पाहू शकता.
 • सादर करण्यापूर्वी प्रिंट फॉर्म वर क्लिक करून त्या फॉर्मची प्रत संग्रहित करून ठेवा..
Go to Navigation