कायदे व तरतूदी च्या प्रतिबंधन सूट नियम
सुट मिळवण्याकरिता "महाकामगार" च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज कसा करावा
कोणत्याही विशिष्ठ कारखान्याविषयी, अथवा त्यातील एका भागाविषयी, अथवा कारखान्यातील प्रक्रियेविषयी विभागाचे अधिकारी संतुष्ट असल्यास ते सदर कारखान्यास लेखी आदेशाद्वारे सशर्त सुट देऊ शकतात. त्या सुटीची व्याप्ती व शर्ती लेखी आदेशामध्ये नमूद केल्या जाता.
नियमानुसारच्या कामाच्या तासांमध्ये काही वाढ झाल्यास अर्जदार कारखाने अधिनियम १९४८ च्या कलम ५१, ५४, ५६ अंतर्गत सुट मिळवण्यासाठी व कारखान्यात अतिकालिक काम लावण्यासाठी अर्ज करू शकतात. सदर प्रक्रियेसाठी हा फॉर्म भरून तो पुढील कारवाईसाठी विभागाकडे पाठवावा लागतो.
प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.
अ. क्र. |
शीर्षक |
डाउनलोड |
1 |
कलम ५१-५४-५६ अंतर्गत सुट (अतिकालिक काम) |
(43
KB) |
2 |
कलम ६६-१-ब अंतर्गत सुट (स्त्रियांचे अतिकालिक काम) |
(35
KB) |
3 |
कलम ७१-ब अंतर्गत सुट (ट्रेलर पंप) |
(35
KB) |
आवश्यक बाबी
- कलम ५१, ५४, ५६ अंतर्गत सुट मिळवण्याकरिता अर्जाचा नमुना - र १०/- चा कोर्ट फी स्टँप लावावा.
- नेहमीच्या कामाच्या तासांकरिता फॉर्म १६
- प्रस्तावित अतिकालिक कामाकरिता फॉर्म १६
- कामगारांकडून व कामगार संघटनांकडून अतिकालिक कामाकरिता संमतीपत्र.
टीपा
- अर्जदारास इ-मेलद्वारे अथवा एस.एम.एस.द्वारे सूचित करण्यात येईल. त्यासाठी आपला इ-मेल आयडी व मोबाईल क्रमांक येथे दर्ज करावा, ही विनंती.
- द्वैभाषिक नमुना माहिती भरलेला एक फॉर्म आपल्या संदर्भासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या अर्जाच्या उजव्या बाजूच्या वरील कोप-यातील "हेल्प" वर क्लिक करून आपण सदर फॉर्म अभ्यासू शकता.
- हा अर्ज सादर करण्यापूर्वी "प्रिंट फॉर्म" वर क्लिक करून या अर्जाची एक प्रत छापून घ्या.