कामगार आयुक्त

कायदे/नियम

ठळक वैशिष्ट्ये

  • ज्याने वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेली असतील परंतु साठ वर्ष पूर्ण नसतील असे सर्व घरेलू कामगार पात्र असतील.
  • घरेलू काम हा प्रामुख्याने महिलांचा व्यवसाय आहे.तो भारतामध्ये वाढायला सुरुवात झाली आहे.

वरील नियम आणि कायदे यांचे मुख्य वैशिष्टे

उदिष्टे

महाराष्ट्र राज्यातील घरेलू कामगारांच्या कल्याणास चालना देण्यासाठी मंडळे स्थापन करण्याकरिता तसेच त्या कामगारांना विविध वित्तीय लाभ देण्यासाठी निधी निर्माण करण्याकरिता आणि त्याच्याशी संबंधित व तदनुषंगिक बाबींकारिता तरतूद करणे इष्ट आहे.

कल्याणकारी मंडळ स्थापनेच्या अंमलबजावणीचा कायदा(भाग ३)

  • एक मंडळ किंवा अनेक मंडळे हे एका जिल्या करिता किंवा एक मंडळ हे एकापेक्षा अनेक जिल्याकरिता
  • मालक व घरेलू कामगार यांचे प्रतिनिधीत्व करणा-या सदस्यांची संख्या समसमान असेल आणि राज्य शासनाचे प्रतिनिधित्व करणा-या सदस्यांची संख्या हि, मालक व घरेलू कामगार यांचे प्रतिनिधीत्व करणा-या एकूण सदस्य संख्येच्या एक तृतीयांशाहून अधिक असणार नाही.
  • घरेलू कामगार कल्याण मंडळ स्थापनेची अधिसूचना महाराष्ट्र सरकारने १ मे २०११ मध्ये दिली.
Go to Navigation