कामगार आयुक्त

घरेलू कामगाराविषयी

"घरेलू कामगार" याचा अर्थ असुरक्षित तसेच घरेलू काम करण्याकरिता ठेवण्यात आलेला कामगार असा आहे.घरेलू कामगार यांचे काम हे अंशकालीन स्वरूपाचे असते.व ते एका पेक्षा जास्त मालकाकडे काम करतात.

कामगार आणि मालक याचे संबंध हे अंशकालीन स्वरूपाचे आहे.त्यांच्या कामाचे तास हे ठराविक नसतात.त्यांच्याकडून जास्त काम करून घेतले जायचे.जसजसे शहरामध्ये लोकसंख्या वाढत गेली तसतसे घरेलु काम करणा-या महिलाची कामगार संख्या वाढत गेली. सर्वेनुसार अंदाजे १.५ दशलक्षां पेक्षा जास्त कामगार हे घरेलू काम करतात. तसेच सर्वेनुसार मालकांची हि संख्या ४ ते ५ दशलक्ष महाराष्ट्रात आहे.घरेलू कामगार हे कायद्याच्या कोणत्याच भागांमध्ये येत नाहीत.तसेच त्यांना काही लाभ मिळावा.यासाठी महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे कि,घरेलू कामगार हे कायद्याच्या एका भागात येतील त्यासाठी एक कायदा बनविला त्या अधिनियमास महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम २००८ असे म्हणतात.

संपर्क

कामगार भवन,४ था मजला, सी-२०,इ-ब्लॉक,
रिझर्व बँकेच्या विरुद्ध बाजूला, बीकेसी, बांद्रा(पूर्व),मुंबई-५१.
फोन.०२०-२६५७ २९२२/२६५७ २९२५/२६५७ ३८९२.
फॅक्स नं.०२२-२६५७ ३८९२.
ईमेल आयडी - mahalabourcommr@gmail.com

Go to Navigation