कामगार आयुक्त

ग्राहक मूल्य निर्देशांक

कामगार आयुक्त, मुंबई, यांचे कार्यालय प्रत्येक महिन्यात महाराष्ट्रातील निवडक केंद्रांकरिता कामगार वर्गासाठी ग्राहक मूल्य निर्देशांक तयार करून प्रकाशित करते. ही केंद्रे पुढीलप्रमाणे :- मुंबई, सोलापूर, नागपूर, पुणे, नाशिक, जळगाव, नांदेड, औरंगाबाद, कोल्हापूर आणि अकोला. (मूलाधार १९८२=१००). राज्यातील वस्त्रोद्योग, औषधनिर्मिती, उद्योग, अभियांत्रिकी उद्योग, या व तत्सम इतर सर्व औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना देय असलेल्या महागाई भत्त्याचे गणन करण्याकरिता हे निर्देशांक वापरले जातात.

Go to Navigation