मुंबई औद्योगिक संबंध
काही विशिष्ठ उद्योग, उदाहरणार्थ, कापड गिरण्या, सहकारी बँका, साखर कारखाने, मुंबईतील उर्जानिर्मिती उद्योग, बेस्ट, इत्यादी उद्योगांना हा अधिनियम लागू आहे. या अधिनियमा नुसार, "प्रतिनिधीत्व करणारी कामगार संघटना" म्हणून कार्यरत असलेल्या संघटनांची नोंदणी करण्याच्या
तरतुदी आहेत. अशा प्रकारची संघटना निर्दीष्ट स्थानिक प्रदेशमध्ये व विशिष्ठ उद्योगातील कामगारांच्या वतीने वाटाघाटी करत असते. प्रतिनिधी कामगार संघटनांशी, किंवा स्वेच्छेने अथवा कामगार न्यायालयाने नियुक्त केलेल्या लवादाबरोबर, किंवा वेतन मंडळांशी वाटाघाटी करून औद्योगिक
विवाद सोडविण्यास आवश्यक ती वैधानिक यंत्रणादेखील या अधिनियमामध्ये उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे एखादा कामगार थेट कामगार न्यायालयासारख्या लवाद यंत्रणेकडे वैयक्तिक पातळीवर धाव घेऊन त्याच्याशी संबंधित विवाद सोडवू शकतो.