विकास आयुक्त (असंघटीत कामगार)

राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना

केंद्रशासनाने दि. 01.10.2007 रोजी दारिद्रय रेषेखालील कुटूंबाकरिता राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना घोषित केली आहे. केंद्र शासन पुरस्कृत दारिद्रय रेषेखालील कुटूंबाकरिता राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना दिनांक 28 मार्च 2008 च्या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आली आहे. सन 2008-2009 मध्ये योजनेच्या अंमलबजावणीच्या पहिल्या टप्प्यात अमरावती, जळगाव, नागपूर, नांदेड, ठाणे, सोलापूर आणि यवतमाळ या 7 जिल्हयांमध्ये सदर योजना राबविण्यास सुरुवात करण्यात आली.

दिनांक 12.01.2009 च्या शासन निर्णयान्वये सन 2008-2009 मध्ये रत्नागिरी, बुलढाणा, चंद्रपुर, लातूर, अकोला, रायगड, गोंदिया, गडचिरोली, सिंधुदूर्ग, वाशिम, भंडारा, जालना, हिंगोली, वर्धा, नंदुरबार या अतिरिक्त 17 जिल्हयात ही योजना लागू करण्यात आली व उर्वरित औरंगाबाद, बीड, नाशिक, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, उस्मानाबाद, परभणी,, सांगली व धुळे या 11 जिल्हयात सदर योजना सन 2009-10 पासून लागू करण्यात आली आहे.

राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेची वैशिष्टे आणि सदर योजनेखाली दिले जाणारे लाभ पुढीलपमाणे आहेत –

  • सदर योजनेंतर्गत आतापर्यंत अंमलबजावणीच्या पहिल्या फेरित 22,43,501 दुस-या फेरीत 21,76,491 तसेच तिसऱ्या फेरीत 8,55,797 स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आलेले असून 1,98,600 लाभार्थींनी या योजनेंतर्गत रु. 1,06,76,91,683/- इतक्या रकमेचा लाभ घेतलेला आहे.
  • वार्षिक योजना 2012-13 करिता रु. 7.50 कोटीची तरतूद करण्यात आलेली होती. सन 2013-14 या आर्थिक वर्षाकरीता रु. 13 कोटी इतकी तरतूद मंजुर करण्यात आलेली आहे.
Go to Navigation