विकास आयुक्त (असंघटीत कामगार)

जनश्री विमा योजना

महाराष्ट्रातील असंघटित कामगारांची संख्या मोठी असून, संघटित कामगारांना मिळणा-या लाभासारखे लाभ त्यांना मिळत नाहीत, तसेच या क्षेत्रातील ब-याचशा कामगारांचे उत्पन्न हे दारिद्रय रेषेखाली आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाच्यातर्फे राबविण्यात येत असलेली जनश्री विमा योजना महाराष्ट्रामध्ये हया कामगारांसाठी दि. 12.08.2004 आणि 24.10.2005 च्या शासन निर्णयान्वये लागू केली. केंद्र शासनाच्या असंघटीत कामगार विधेयक-2003 अन्वये घोषित केलेल्या 122 व्यवसायांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचा सदर योजनेत समावेश केलेला आहे.

आर्थिक बाबी :

जनश्री विमा योजना ही केंद्र शासन अनुदानित असून एकूण प्रिमीयम खर्चाच्या एक चतुर्थांश हिस्सा राज्य शासन देणार आहे. ही योजना 18 ते 60 वयोगटातील दारिद्रय रेषेखालील व्यक्तींसाठी व दारिद्रय रेषेच्या किंचीत वर असणाऱ्या व्यक्तींसाठी आहे. वार्षिक प्रिमीयम रु. 200/- असून त्यापैकी केंद्र शासनाच्या सामाजिक सुरक्षितता निधीमधून रु. 100/- राज्य शासनाकडून रु. 50/- आणि लाभार्थ्याकडून रु. 50/- भरले जातात.

जनश्री विमा योजनेनुसार सदस्यांना खालीलप्रमाणे लाभ दिले जातात.

  • जनश्री सदस्याचा नैसर्गिक मृत्यु ओढवल्यास त्याच्या वारसदारास रु. 30,000/-
  • अपघाती मृत्यु ओढवल्यास त्याच्या वारसदारास रु. 75,000/-
  • अपघातामुळे कायमस्वरुपी संपूर्ण अपंगत्व ओढवल्यास सदस्यास रु. 75,000/-
  • अंशत: अपंगत्वाकरिता सदस्यास रु. 37,500/-
  • सदस्यांच्या मुलांच्या शिक्षणाकरीता शिक्षा सहयोग योजनेंतर्गत इयत्ता 9 वी ते 12 वी करिता तसेच आय.टी.आय. कोर्स करीत असल्यास व दरवर्षी उत्तीर्ण होत असल्यास दर तिमाहीकरिता रु. 300/- रक्कम प्रत्येकी (जास्तीत जास्त दोन मुलांकरिता) दिली जाते.

सन 2012-13 व सन 2013-14 या वर्षातील देण्यात आलेले लाभ :

भारतीय आर्युविमा महामंडळाच्या दिनांक 15.05.2013 रोजीच्या पत्रानुसार सदर योजनेंतर्गत सन 2012-13 या आर्थिक वर्षामध्ये एकूण 1768 नैसर्गिक मृत्यु पावलेल्या कामगारांच्या वारसांना रु. 5,30,20,000/- रक्कम, अपघाती मृत्यु पावलेल्या 101 कामगारांच्या वारसांना एकूण रु. 75,45,000/- रक्कम तसेच पुर्णत: व अंशत: अपंगत्व आलेल्या 02 कामगारांना रु. 75,000/- रक्कम देण्यात आली आहे. तसेच जनश्री विमा योजनेंतर्गत नोंदीत सदस्यांच्या 2,67,001 पाल्यांना रक्कम रु. 16,02,00,600/- इतकी शिष्यवृत्ती अदा करण्यात आलेली आहे

भारतीय आर्युविमा महामंडळाच्या दिनांक 18.01.2014 रोजीच्या पत्रानुसार सदर योजनेंतर्गत सन 2013-14 मध्ये माहे डिसेंबर-2013 अखेर एकूण 1920 नैसर्गिक मृत्यु पावलेल्या कामगारांच्या वारसांना रु. 5,76,00,000/- रक्कम, अपघाती मृत्यु पावलेल्या 126 कामगारांच्या वारसांना एकूण रु. 94,50,000/- रक्कम देण्यात आली आहे. तसेच जनश्री विमा योजनेंतर्गत नोंदीत सदस्यांच्या 1,66,988 पाल्यांना रक्कम रु. 10,01,92,800/- इतकी शिष्यवृत्ती अदा करण्यात आलेली आहे. सदर योजनेंतर्गत सन 2013-14 मध्ये माहे डिसेंबर-2013 अखेर 2,82,450 कामगारांची नोंदणी/नुतनीकरण झाले आहे.

अनुदान :

सन 2012-13 या आर्थिक वर्षामध्ये जनश्री विमा योजनेच्या अंमलबजावणीकरीता राज्यशासन हिस्स्यापोटी भारतीय आर्युविमा महामंडळास रु. 6.84 कोटी इतकी रक्कम अदा करण्यात आलेली आहे. सन 2013-14 या आर्थिक वर्षाकरीता जनश्री विमा योजनेच्या अंमलबजावणीकरीता रुपये 9.60 कोटी तरतूद करण्यात आलेली आहे. सन 2014-15 या आर्थिक वर्षामध्ये रक्कम रुपये 1 कोटीची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे.

Go to Navigation