विकास आयुक्त (असंघटीत कामगार)

नोंदणी

लाभार्थी घरेलू कामगार नाव नोंदणी.

 • पात्रता : ज्याने वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेली असतील परंतू साठ वर्ष पूर्ण केलेली नसतील आणि जो कोणतेही घरेलू काम करीत असेल तो प्रत्येक घरेलू कामगार, या अधिनियमान्वये लाभार्थी म्हणून नावनोंदणी करण्याकरीता पात्र असेल.
 • नाव नोंदणी अर्ज नमुना च मध्ये, विहित करण्यात येईल (नियम ९(१) अन्वये) आणि तो मंडळाने प्राधिकृत केलेल्या अधिका-याकडे सादर करण्यात येईल.
 • लाभार्थीं म्हणून नोंदणीसाठी करावयाच्या अर्जासोबत खालील कागदपत्रे असावीत.
  • रु.३०/ इतके शुल्क चलन / मागणी अधिकर्ष / पोस्टल ऑर्डर / रोखीने भरण्यात यावे.
  • घरेलू कामगाराचा वयाचा दाखला.
  • सध्याच्या मालकाचे प्रमाणपत्र किंवा तो घरेलू कामगार आहे हे नमूद करणारे लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र.
  • रहिवाशी दाखला.
  • घरेलू कामगाराच्या पासपोर्ट आकाराच्या छायाचित्राच्या तीन प्रती.
  • लाभार्थी म्हणून घरेलू कामगाराची नोंदणी झाल्यानंतर,सचिव त्याची नोंद नोंदवहीत घेईल.हि नोंदवही नमुना छ नुसार असेल.
  • ओळखपत्र :लाभार्थी म्हणून घरेलू कामगाराची नोंदणी झाल्यानंतर मंडळ प्रत्येक लाभार्थींला ओळखपत्र देईल.असे ओळखपत्र नमुना ज नुसार असेल.
  • घरेलू कामगारांचे अंशदान : ज्या घरेलू कामगाराची लाभार्थी म्हणून नोंदणी झाली असेल त्याला,नोंद झालेल्या मंडळाकडे रु.५/- इतके अंशदान दरमहा द्यावे लागेल.

ऑनलाईन घरेलू कामगार नोंदणी प्रक्रिया

 • 'ऑनलाईन अर्ज' या बटनवर क्लिक करा.
 • घरेलू कामगार नोंदणी अर्ज दिसेल.
 • त्या अर्जवरील सर्व माहिती भरा. असे दिसणारी माहिती भरणे गरजेचे आहे. त्यामध्ये नाव,पत्ता,जन्मतारीख आहे.
 • त्यानंतर 'Submit /सादर करा' बटन वर क्लिक करा.
 • अर्ज 'submit / सादर करा' केल्यावर मेसेज बॉक्स मध्ये नोंदणी नं दिसेल.
 • नोंदणी क्र.लिहून घ्या आणि लक्ष्यात ठेवा.

घरेलू कामगार मंडळ नाव नोंदणीसाठी शिबीर घेतात.घरेलू कामगार नाव नोंदणी फी.३० रु.व वार्षिक फी ६० रु. आहे.लाभार्थी म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी नोंदणी नं.देवून बायोमेट्रिक मशीनद्वारे नाव नोंदणी केली जाते.त्यानंतर एक आठवड्यांनंतर घरेलू कामगार मंडळामध्ये जावून ओळखपत्र/स्मार्ट कार्ड घ्यावे.

लाभार्थींना लाभ

 • अपघात घडल्यास लाभार्थींना तत्काळ सहाय्य पुरविणे.
 • लाभार्थीच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे.
 • लाभार्थीच्या अथवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या वेक्तीच्या आजारावर उपचार करण्यासाठी वैदकीय तरतूद करणे.
 • महिला लाभार्थींकरिता प्रसुती लाभाची तरतूद करणे.परंतु असे प्रसुती लाभ हे केवळ दोन मुलापर्यंत देण्यात येईल.
 • लाभार्थीचा मृत्यू झाल्यावर त्याच्या कायदेशीर वारसाला अंत्यविधीच्या खर्चासाठी रक्कम प्रदान करणे.
 • मंडळाने वेळोवेळी निश्चित केलेले असे इतर लाभ.
S. No. Registration Form Details
1 घरेलू कामगार नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन अर्ज वाचा/जतन करा
2 जिल्याचे व तालूक्याचे नाव आणि युनिक कोड नं. वाचा/जतन करा
3 मुंबई,मुंबई-वांद्रे,ठाणे वाचा/जतन करा
4 रत्नागिरी,सिंधुदुर्ग,नाशिक,धुळे वाचा/जतन करा
5 जळगाव,अहमदनगर,पुणे वाचा/जतन करा
6 सातारा,सांगली,सोलापूर,कोल्हापूर वाचा/जतन करा
7 औरंगाबाद,जालना,परभणी,बीड वाचा/जतन करा
8 नांदेड,उस्मानाबाद,लातूर,अमरावती वाचा/जतन करा
9 अकोला,बुलढाणा,वाशीम,भंडारा,यवतमाळ वाचा/जतन करा
10 नागपूर,वर्धा,भंडारा,गोंदिया वाचा/जतन करा
11 चंद्रपूर,गडचिरोली वाचा/जतन करा
12 घरेलू कामगार ओळखपत्र/स्मार्ट कार्ड नोंदणी अर्ज. वाचा/जतन करा
13 लाभ मिळवण्यासाठी लाभार्थींने करावयाच्या अर्जाचा नमुना. वाचा/जतन करा
Go to Navigation