विकास आयुक्त (असंघटीत कामगार)

घरगुती कामगारांसाठी कल्याण योजना

घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे राबविण्यात येणा-या कल्याणकारी योजना

सदर अधिनियमाच्या कलम 10 अन्वये घरेलू कामगारांसाठी पुढील कल्याणकारी योजनांची तरतूद केलेली आहे.अपघात घडल्यास लाभार्थींना तात्काळ सहाय्य पुरविणे, लाभार्थींच्या मुलांच्या शक्षणासाठी आर्थिक सहाय्य देणे, लाभार्थींच्या अथवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीच्या आजारावर उपचार करण्यासाठी वैदयकीय खर्चाची तरतूद करणे, महिला लाभार्थींकरीता प्रसुती लाभाची तरतूद करणे, लाभार्थीचा मृत्यू झाल्यावर कायदेशीर वारसाला अंत्यविधीच्या खर्चासाठी रक्कम प्रदान करणे. मंडळातर्फे देण्यात येणारे लाभ :

1. अंत्यविधी सहाय्य : मृत घरेलू कामगाराच्या कायदेशिर वारसास अंत्यविधी सहाय्य रु.2,000/- देण्यात येते.

2. प्रसुती लाभ : घरेलू कामगार मंडळाच्या दि. 28.09.2012 च्या बैठकीत घरेलू कामगारांना प्रसुतीलाभ देण्याबाबत ठराव करण्यात आला असून त्याअंतर्गत घरेलू कामगारास दोन अपत्यापर्यंत प्रत्येक प्रसुतीकरीता रु.5,000/- इतकी मदत देण्यात येते.

3. सन्मानधन लाभ : दिनांक 31.07.2014 पर्यंत ज्या नोंदीत घरेलू कामगारांनी वयाची 55 वर्षे पूर्ण केली आहे अशा नोंदित घरेलू कामगारांना सन्मानधन योजनेअंतर्गत प्रत्येकी रू. 10,000/- देण्यात येतात.

Go to Navigation