दृष्टीकोन
हा विभाग वरील नेमून दिलेली कामे गेली १५० वर्षे यशस्वीरित्या करीत आहे. आधुनिक काळाबरोबर बदललेल्या जागतिक तंत्रज्ञानामुळे, आधुनिक सुधारणा हया विभागाने अवलंबिल्या आहेत. हा विभाग वरील सर्व कामे आद्यापावेतो हाताने करीत आहे. तथापी हया विभागाची भविष्यातील दृष्टी
खालिलप्रमाणे आहे.
- विभागाचे संपूर्ण संगणकीकरण.
- सुधारीत सक्रीय संकेतस्थळाचे जाळे (वेब).
- नागरी सेवा पुरविण्यासाठी, तात्कालीक पध्दतीचे सुलभीकरण आणि पारदर्शकतेची जोपासना करणे.
- हया विभागातर्फे देण्यात येणा-या काही सेवा 'एक खिडकी' योजने खाली उद्योग सेतु व्दारे उपलब्ध असतील.
- नागरीकांच्या तक्रारी/सुचना प्राप्त करण्याकरीता व्यवस्थेचा विकास करणे.
- नागरीकांची मते आजमावण्याकरीता व्यवस्थेचा विकास करणे.
- बाष्पक ते प्रेशर वेसल्स निर्मीती, तपासणी आणि अपघाताचे विश्लेषण या क्षेत्रामध्ये अग्रगण्य निरीक्षण संस्था प्राप्त करण्याच्या उद्यीष्टाकरीता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करुन आंतरराष्ट्रीय तपासणी संस्थांची बरोबरी करणे.
- सुपर क्रीटीकल बाष्पक, ज्यामध्ये बाष्पक व पाणी यांची घनता समान असते, अशा बाष्पकांचे उत्पादन उभारणी, नोंदणी व तपासणीकरीता तंत्राचा विकास करणे. अपारंपारीक उर्जेच्या वापराला प्रोत्साहन देऊन सौर उर्जेवर चालणारे बाष्पक उत्पादन करणा-या संस्थांना मदत व प्रोत्साहन
देणे.
- बाष्पक अधिनियम, १९२३ आणि त्यामधील सुधारणा संबंधी जनजागृतीसाठी मुंबई मुख्य कार्यालयासह प्रादेशिक कार्यालयांमध्ये जनजागृती उपक्रम राबवणे.