सुपर क्रिटीकल बाष्पक
जे बाष्पक क्रिटीकल बाष्पदाब व त्या दाबापेक्षा जास्त दाबावर कार्य करते त्याला सुपर क्रिटीकल बाष्पक म्हणतात. बाष्पाचे क्रिटीकल दाब 22.064 मेगा पास्कल व क्रिटीकल तापमान 373.9460C आहे. या क्रिटीकल पॉईंटवर बाष्पाची लॅटेंट हिट शून्य असते तसेच पाणी व बाष्पाच्या
घनतेमध्ये काहीच फरक नसतो. भविष्यामध्ये अशा प्रकारचे बाष्पके, महाराष्ट्रात विज निर्मिती करता वापरले जातील.
ठळक वैशिष्टये
- 25.4 मेगा पास्कल बाष्पदाब व 5710C बाष्प् तापमानावर 42.26% एवढी कार्यक्षमता मिळते.
- बाष्पक चालविण्यामध्ये लवचिकता, प्रेशर स्लाईडिंग मोडवर वापरणे शक्य व लोडमध्ये स्थिरता.
- 2035 किलो कॅलरी/युनिट एवढा कमी हिट रेट मिळणे शक्य.
- कमी प्रदूषण.