बाष्पके संचालनालय

लहान औद्योगिक बाष्पक

लघु उद्योजकांना बाष्पकाची आवश्यकता असते व ते लहान औद्योगिक बाष्पक वापरतात. ते चांगल्या प्रकारची वाफ तयार करतात आणि इतर बाष्पकांपेक्षा कार्यक्षम असतात. लहान बाष्पकांना बाष्पक चालविणा-या व्यक्तीची गरज भासत नाही हे सर्वात उपयुक्त आहे.

सर्व बाष्पकांची, बाष्पके संचालनालयाचे अधिका-यांकडून वार्षिक तत्वावर तपासणी केली जाते. बाष्पकांचे प्रकार व मर्यादा असते, जसे की शेल टाईप बाष्पकाची पाण्याची क्षमता आणि वापर दाब मर्यादित आहे, जसे ५०० लि. पाणी आणि वापर दाब ७ कि. ग्राम/चौ.से.मी. पर्यंत अनुक्रमे आहे. पाण्याचा टयूब (वॉटर टयूब टाईप) बाष्पकात १५० लिटर पाणी व वापर दाब १२ कि.ग्राम/चौ.से.मी. पर्यंत अनुक्रमे आहे.

Go to Navigation