बाष्पके संचालनालय

संचालकांचे प्रोफाइल

हे प्रभारी संचालक या पदावर बाष्पके संचालनालय, मुंबई येथे कार्यरत आहेत. त्यांना बाष्पके संचालनालय या कार्यालयात येण्यापूर्वी त्यांचेकडे ऊर्जा निर्मिती, बाष्पक संचलन, संधारण, उभारणी व विविध प्रकारच्या बाष्पकांचे निरीक्षण याबाबतचा अनुभव आहे. ते या संचालनालयात 2001 मध्ये उप संचालक या पदावर रूजू झाले व त्यानंतर त्यांनी या संचालनालयाच्या अधिपत्याखालील राज्यातील वेगवेगळया विभागीय कार्यालयात काम केलेले आहे.

त्यांनी नागपूर ‍ विद्यापीठातून सन 1991 मध्ये मॅकेनिकल इंजिनिअरींग मध्ये पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन, चंद्रपूर येथे वेगवेगळया विभागात काम केलेले आहे. त्यांनी ‍शिवाजी विद्यापिठ, कोल्हापूर येथून एम.टेक.(एनर्जी टेक्‍नोलॉजी ) ही पदवी प्राप्त केली आहे. ते प्रथम श्रेणी बाष्पक अभियंता परीक्षा उत्तीर्ण आहेत.

श्री. ध.प्र.अंतापूरकर हे केंद्रीय बाष्पक मंडळ, वाणिज्य अणि उद्योग मंत्रालय, नवी दिल्ली या केंद्र शासनाच्या समितीचे सदस्य आहेत. तसेच ते बाष्पक परिचालन अभियंता व बाष्पक परिचर परीक्षांसाठी परीक्षक मंडळ, महाराष्ट्र राज्य याचे अध्यक्ष आहेत.

Go to Navigation