बाष्पके संचालनालय

बाष्पके निरीक्षण करताना घ्यायची खबरदारी

अपघात टाळण्यासाठी सर्व अधिका-यांना बाष्पक / बाष्पकाच्या भागांची तपासणी (निरिक्षण) करत्यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने सुचित करण्यात येते की, मे. घरडा केमिकल कंपनीत एक अधिकारी बाष्पकाचे निरिक्षण करत्यावेळी बाष्पकात पडले आणि जखमी झाले. तेव्हा सर्व अधिका-यांच्या नियुक्तीनंतर बाष्पकाचे निरीक्षण करतेवेळी घ्यावयाच्या सावधगिरी बाबत मार्गदर्शन द्यावयाचे आहे. तेव्हा खालीलप्रमाणे सर्व अधिका-यांनी त्यांच्या सुरक्षाच्या दृष्टीने सावधगिरी बाळगावी.

 • कारखान्याच्या आवारात प्रवेश करतेवेळी डोक्यावर शिरस्त्राण असणे अत्यंत आवश्यक आहे शिरस्त्राणेशिवाय कारखान्यात प्रवेश करु नये. जेव्हा एखादया अधिका-याकडे शिरस्त्राण उपलब्ध नसेल तर कारखान्याकडे तात्पुरत्या वेळेसाठी शिरस्त्राण मागावे.
 • बाष्पकाची (ऑईल फायर्ड बाष्पक) तपासणी करताना बाष्पकांवर चढण्यापूर्वी बाष्पकाच्या सभोवती तेल पसरलेले नाही याची खात्री करावी.
 • वरील सत्यता, पूरेसा प्रकाश असल्याशिवाय करता येणार नाही. म्हणून पूरेसा प्रकाश उपलब्ध असल्यावरच तपासणी करावी.
 • मोठया बाष्पकांवर तपासणीसाठी (निरीक्षणासाठी) चढण्यास उपलब्ध असलेल्या परातीची (Platform of workman) मजबूती व ताठपणाची खात्री करुन घ्यावी. सर्वसाधारणपणे परातीची प्लाय ८"x९" असावी, जेणेकरुन बाष्पक सर्व बाजूने पूर्णपणे तपासणी करता आला पाहिजे.
 • सर्व बाष्पक मालकांनी, बाष्पक कायदा १९२३ नुसार कलम-१४(२) अन्वये बाष्पक निरीक्षणासाठी पुरेशी सुरक्षितता उपलब्ध करुन दिली पाहिजे. जर पराती किंवा शिडी पुरेशी मजबूत नाही, असे वाटल्यास बाष्पकाची तपासणी निरीक्षक कलम-१४(२) अन्वये नाकारु शकतो व तसा अहवाल संचालकांना सादर करु शकतो.
 • जेव्हा वाफेच्या पिंपामध्ये (ड्रम) उतरुन पिंपाच्या आतील पृष्ठभागावर आघात करतेवेळी गुडघ्यांना जखम होण्याची शक्यता असते म्हणून आतील भागातील सांधकाम (वेल्डींग) काळजीपूर्वक बघून घ्यावे व नंतर पिंपामध्ये तपासणीसाठी (निरिक्षणासाठी) प्रवेश करावा. डोळे आणि डोके यांची योग्य काळजी घ्यावी.
 • वाफेचे पिंप (स्टीम ड्रम) / पाण्याचे पिंपामध्ये (वॅटर ड्रम) उतरताना मॅनहोल उघडून पिंपाच्या आतील पृष्ठभाग बघावा. बाष्पकाच्या आतील भागात साप, कुत्रे व मधमाश्यांचे पोळे बाष्पकाच्या बाहेरील भट्टीमध्ये असण्याची शक्यता असते.
 • ब्लो डाऊन बॅटरी बाष्पकला जोडलेली नाही याची खात्री करुन घ्यावी. नाहीतर निरिक्षक कलम-१४(२) अन्वये तपासणी नाकारु शकतो व तसा अहवाल संचालकांना ताबडतोब सादर करु शकतो.
 • पाणी पुरवठा करणा-या पंपचा फ्यूज काढला आहे का याची खात्री करावी. बाष्पकाच्या बॅटरीपासून बाष्पक वेगळा केला आहे का याची खात्री करुनच निरिक्षण करावे, अन्यथा निरीक्षक कलम-१४(२) अन्वये तपासणी (निरिक्षण) करण्याचे नाकारु शकतो आणि त्याप्रमाणे संचालकांना अहवाल सादर करु शकतो.
 • तेलावर चालणारा लहान किंवा मोठया बाष्पकाचे निरिक्षण करण्यासाठी प्रवेश करताना बर्नरचा फ्यूज काढला आहे किंवा नाही, याची खात्री करुनच निरिक्षण करावे.
 • पेट्रोलियम उद्योगात कार्बन मोनॉक्साईडचा बाष्पकामध्ये इंधन म्हणून उपयोग केला जातो. अशा बाष्पकाचे निरिक्षण करताना बाष्पकात कार्बन मोनॉक्साईड वायू आहे किंवा नाही, याची खात्री करावी आणि तपासणी करावी. कार्बन मोनॉक्साईड वायू हा गंधहीन असल्यामुळे घातक आहे.
 • बाष्पकांची जलदाब चाचणी ही प्रमाणित दाबापेक्षा १.२५ पट केली जाते. उर्जा बाष्पकात जलचाचणी करताना पाण्याच्या उच्च दाबामुळे कंट्रोल रुममधील प्रमापीवर दाब किती आहे हे पहावे. चाचणी समाधानकारक आढळल्यावर दाब कमी करुन पूर्ववत दाबापर्यंत आल्यावरच बाष्पकात प्रवेश करावा. उच्च दाबात बाष्पकाची अघात चाचणी करु नये. कारण उच्च दाबामुळे हातोडा जोरात बाहेर उडण्याची शक्यता असते.
 • सौर उर्जा बाष्पकाची वाफ चाचणी करताना, उच्च तापमानामुळे आरसा आणि कनेक्टरमधून प्रवेश करु नये. अशा प्रकरणात उष्णता रोधक व्यवस्था केल्याची खात्री करावी. वाफ चाचणी करताना कान मास्क (इअर मास्क) किंवा बोळे वापरावे. मोठया आवाजामुळे कानांना त्रास होण्याची शक्यता असते.
Go to Navigation