आमच्याबद्दल
बाष्पक म्हणजे ज्या बंद पात्र साधनात दाबाखाली बाष्प निर्मीती होते. हे बाष्प ऑईल मिल, वस्त्र उद्योग, रासायनिक उद्योग, पेट्रोकेमिकल्स, रिफायनरिज (कच्चे
खनिज तेल), दुग्ध/खादय व्यवसाय, हॉटेल उद्योग, विजनिर्मीती इत्यादीसाठी वापरली जाते. या सर्व उद्योगात बाष्पकांची गरज भासते. जरी बाष्पक हा अत्यंत उपयोगी असला तरी त्याच्या स्फोटकतेमुळे तो धोकादायक ठरु शकतो. अपघात हे बाष्पकाच्या स्फोटामुळे होतात व त्यामुळे जिवीत
व वित्त हानी होऊ शकते. इ.स.१८६९ मध्ये मुंबईत झालेल्या दोन बाष्पक अपघातात जिवीत व वित्त हानी झाली. म्हणुन इ.स.१८६९ मध्ये मुंबई येथे बाष्पक निरीक्षण विभागाची स्थापना करण्यात आली आणि त्यानंतर भारतीय बाष्पक अधिनियम १९२३, राष्ट्रीय पातळीवर अंमलात आला.
त्यानंतर भारत सरकारने 'भारतीय बाष्पक विनियम १९२४' अंमलात आणले व हे विनियम इ.स.१९५० मध्ये 'भारतीय बाष्पक विनियम १९५०' असे बदलण्यात आले. हया
विनियमात बाष्पक नकाशे, बांधणीचा प्रकार, नोंदणीकरण, निरीक्षण, नेमून दिलेले प्रमाणपत्र हया इत्यादी संबंधीचे मार्गदर्शन समाविष्ट केलेले आहे. या नंतर 'भारतीय बाष्पक अधिनियम १९२३' वर आधारित 'महाराष्ट्र बाष्पक नियम १९६२' आणि 'महाराष्ट्र मितोपयोजक नियम १९६५' अस्तित्वात
आले.
भारतीय बाष्पक अधिनियम इ.स. २००७ मध्ये सुधारीत होऊन 'बाष्पक अधिनियम १९२३' असा करण्यात आला. नंतर मार्च - २०११ मध्ये 'बाष्पक परिचर नियम २०११' व 'बाष्पक परिचलन अभियंता नियम २०११' असे अस्तित्वात आले.
संचालकांचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. विभागीय कार्यालये पुणे, नागपूर, अहमदनगर, कोल्हापूर, नाशिक व सोलापूर येथे आहेत.
बाष्पकाची कायदयात्मक व्याख्या
(25 KB)