बाष्पके संचालनालय

संचालकांचे संदेश

श्री. ध.प्र.अंतापूरकर , संचालक, बाष्पके संचालनालय, मुंबई.

बाष्पके संचालनालय या विभागास 147 वर्षाची प्रदीर्घ अशी परंपरा आहे. या विभागामार्फत बाष्पक आणि बाष्पकांशी निगडीत क्षेत्रांना सेवा दिल्या जात आहे. या विभागाचा मुळ उद्देश हा बाष्पकांना होणारे अपघात व स्फोट टाळणे आणि जिवीत व मालमत्तेचीसुरक्षा करणे हा आहे.

बाष्पके संचालनालयामार्फत बाष्पकांचे निरीक्षण व निर्मीती दरम्यान निरीक्षण बाष्पके अधिनियम-1923, भारतीय बाष्पके ‍विनियम-1950 अन्वये केले जाते. केंद्र शासनाने सन 2007 मध्ये बाष्पके अधिनियम-1923 हया कायदयात आमूलाग्र सुधारणा करण्यात आली आहे.

बाष्पक सयंत्र हे वाफेशी संबंधित आहे व यामुळे हे संयंत्र घातक व स्फोटक हेाऊ नये आणि सुरक्षित असावे याकरीता याचे उत्पादन, उभारणी, वापर व व्यवस्थापन या वरील कायद्यान्वये व विनियमाव्दारे दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार करणे व बाष्पकाची नियमित तपासणी करून सदर बाष्पक हा सुरक्षित असल्याचे प्रमाणित करणे हे या संचालनालयाचे मुख्य काम आहे.

महाराष्ट्र राज्य हे बाष्पक उत्पादन क्षेत्रात अग्रगण्य राज्य आहे. या संचालनालयाचे अधिकारी बाष्पकाची तपासणी अतिशय काटेकोरपणे कायद्यातील नियमानूसार कार्यक्षमतेने पार पाडून जिवित व मालमत्तेची सुरक्षा करतात. यामुळेच या राज्यामध्ये अनेक वर्षात बाष्पकांना कोणताही मोठा अपघात होऊन त्यामध्ये वित्त व जिवीतहानी झालेली नाही. असे अभिमानाने नमूद करावेसे वाटते.

या संचालनालयातर्फे बाष्पक परिचालन अभियंता नियम, २०११ अणि बाष्पक परिचर नियम, २०११ नुसार बाष्पक परिचालन अभियंता आणि बाष्पक परिचर यांच्याकरिता परीक्षा घेतल्या जातात व अशा तज्ञ लोकांकडून बाष्पके चालविली जात असल्याने बाष्पकांची सुरक्षितता राखून लोकांना या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.

या संचालनालयामार्फत बाष्पकांचे वापरकर्ते, उत्पादक यांच्यासाठी आणि बाष्पकांचा सुरक्षित व प्रभावी वापराकरीता आधुनिक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होण्याकरीता जनाजागृती कार्यक्रम व कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. याचा लाभ राज्यातील सर्व बाष्पक क्षेत्रातील काम करणा-या व्यक्तींना /उद्योजकांना होतो. पुढे हे संचालनालय लवकरच विभागातील सर्व सेवा करीता संगणक प्रणाली विकसीत करून त्याव्दारे सर्वांना सेवा पुरविण्यासाठी कटिबध्द आहे, याकरिता आपल्या बहुमोल सुचना व मार्गदर्शन व्हावे. काही सेवा संगणक प्रणालीव्दारे सुरू केल्या आहेत. या नवीन योजनेचा उद्योजकांनी फायदा घ्यावा. असे मी आपणास आवाहन करतो.

बाष्पक हाताळतांना कोणत्याही निष्काळजीपणामुळे जिवीत व वित्तहानी होऊ शकते याकरिता बाष्प्काची सुरक्षितता ही अत्यंत महत्वाची असल्याने मी आपणा सर्वांना आवाहन करतो की, बाष्पके कायदा व नियम यांचे काटेकोरपणे पालन करावे व सुरक्षा नियम पाळावेत अणि ते पाळण्याकरिता इतरांना उद्युक्त करावे. तसेच आपल्या सभोवताली कुठेही अनधिकृत बाष्पक तयार होत असेल किंवा वापरले जात असेल तर त्याची सुचना लगेच या संचालनालयाच्या जवळच्या कार्यालयाला दूरध्वनीव्दारे किंवा ई मेल द्वारे कळवावे. जेणे करून संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करता येईल.

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला चार कोटी वृक्षारोपनाच्या संकल्पास प्रतिसाद म्हणून या संचालनालयाने महाराष्ट्र कार्यरत असलेल्या बाष्पक व आस्थापनामार्फत 2 लाख वृक्षरोपन करण्याचे योजीले आहे. जे दिलेल्या उद्दीष्टांपेक्षा जास्त आहे.

समाजातील दुर्लक्षित असलेली बालसुधारगृहातील मुलांना बाष्पक परीचारक व वेल्डर या कार्यक्षेत्रातील पुरेसा आवश्यक अनुभव देउुन त्यांचे कौशल्य अधिक चांगले होण्यासाठी या संचालनालयाने त्यांना संधी उपलब्ध करुन देणार आहे.

Go to Navigation